शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दादांचं व माझं नातं…” नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मृणाल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाल्या, “ते माझ्या पाठिशी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2023 | 4:49 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
nitin desai suicide case

“दादांचं व माझं नातं...” नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मृणाल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाल्या, “ते माझ्या पाठिशी...”

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या विविध चर्चा सुरु आहेत. बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण नेमकं काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. आर्थिक संकटामुळे नितीन देसाईंनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या या टोक्याच्या निर्णयामुळे संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

मराठीमधील अनेक कलाकारांनी “पुन्हा असा नितीन देसाई होणे नाही” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना नितीन देसाई यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे त्यांनी नितीन देसाईंबरोबर असलेलं नातं याबाबत भाष्य केलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मृणाल यांनाही मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा – शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

मृणाल म्हणाल्या, “दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं. त्यांनी निर्माण केलेल्या ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली. त्यानंतर ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनादरम्यान ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले”.

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

आणखी वाचा – दुर्देवी अंत! एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

पुढे त्या म्हणाल्या, “अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत. कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस. फार मोठा धक्का”. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. ४ ऑगस्टला (शुक्रवारी) एनडी स्टुडिओ येथे नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Tags: nitin desaiNitin Desai commits suicide in karjat studionitin desai suicidenitin desai suicide marathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
rajanikanth's jailer trailer out

सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर'चा ट्रेलर आला समोर, अभिनेत्याचा अॅक्शनपॅक अंदाज पाहून चाहते खुश

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.