हिंमत दाखवणं हा एकच पर्याय – असा शूट केला गौरीने सिन

Girija Prabhu
Girija Prabhu

स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. गौरी आणि जयदीप यांची केमिस्ट्री, त्यांचा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. अनेक वळण त्यांच्या नात्यात पहायला मिळाली.गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू ऑफस्क्रीन देखील प्रेक्षकांना तितकीच आवडते. (Girija Prabhu)

सध्या मालिकेचे कथानक एका वेगळ्या वळणावर आहे. काहींना काही कारणावर जयदीप आणि गौरीला अनेकद अनेक वर्ष एकमेकांपासून दूर व्हावे लागले. खूप त्रास त्यांना सहन करावा लागला.अथक प्रयत्नानंतर शालिनीला धडा शिकवून ते एकत्र आले. शालिनीची खूप मोठी खेळी त्यांनी उधळून लावली. सध्या मालिकेत जयदीपच्या आई ची एन्ट्री झाल्यामुळे एक वेगळे वळण मालिकेला आले आहे.

पहा गौरीने कसा शूट केला सिन (Girija Prabhu)

सोशल मीडियावरून तिचे फोटोशूटचे वेगवेगळे फोटोज देखील ती शेअर करत असते.याचसोबत या कलाकारांचे पडद्यामागचे बॉण्डिंग देखील छान आहे. वेगळेवेगळे मजेशीर रिल्स हे कलाकार बनवत असतात.मालिका पाहताना काहिक वेळा अंगावर काटे उभे राहतील असे देखील सीन्स असतात. तो सिन उत्तम होण्यासाठी अनेकांची त्यामागे मेहनत असते. कलाकार अक्षरशः तो सिन जगात असतात असं म्हणता येईल. असाच , एक अवघड सिन शूट करतानाचा BTS गिरिजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. त्यात ती विहिरीत उतरताना पहायला मिळतेय. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी नॅचरल वाटत आहेत. तिच्या या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तिने असं म्हंटल आहे, आपल्याला माहित नसत आपल्या मध्ये किती हिमंत आहे , आपल्याला ते तेव्हाच कळत जेव्हा हिमंत दाखवणं हा एकच पर्याय आपल्या कडे असतो. तिच्या या व्हिडिओ वर लाईक कमेंट्स करून प्रेक्षकांनी तीच कौतुक केलं आहे . आणि प्रेक्षकांसोबतच, अभिनेता विकास पाटील याने, खोलात जाऊन अभिनय .अशी कमेंट करून तीच कौतुक केलं आहे. (Girija Prabhu)

हे देखील वाचा : अबब हे काय…! तन्वी गिरिजाचा सारखाच ड्रेस

गिरीजा तिच्या वेगळ्या वेगळ्या लूक्स साठी देखील चर्चेत असते. तिची अभिनयातील सहजता, साधेपणा प्रेक्षकांना आपलासा वाटतो. तिच्या या लाघवी अभिनयामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते. त्यामुळे मालिकेत तिला त्रास झाला तरी प्रेक्षकांना वाईट वाटते. हीच आपल्या चांगल्या कामाची पावती असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Bhagya Dile Tu Mala Today Episode
Read More

राज कावेरी आणि वैदेहीच Reunion!सानियाला होणार अटक?

पोलीस सानिया पर्यंत पोहचणार का? सानिया विरोधात विधीने साक्ष दिल्यावर माहेरचा चहा रत्नमाला मोहिते आणि राज कावेरीला त्यांची पूर्ण प्रॉपर्टी परत मिळणार का?
Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode
Read More

अरुंधती परतणार! आशुतोषला भावना अनावर अरुंधतीला मारली घट्ट मिठी

अरुंधतीच्या येण्यानं गोखले कुटुंब आनंदी तर देशमुख कुटुंब मध्ये संजना अनिरुद्धचा वाद सुरूच अरुंधती रागात म्हणाली मी कोणासाठी उपवास धरू या अनिरुद्ध साठी तर ते...... (Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)