‘मी मॅच पहिली नाही कि तो लवकर आऊट व्हायचा’ सचिनच्या बॅटिंगसाठी चक्क १२वीच्या पेपर सोडून घरी आले होते तरडे…

Pravin Tarde Sachin Tendulkar incident
Pravin Tarde Sachin Tendulkar incident

तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानात एकदा तरी घुमलेला आणि प्रत्येकाच्या ओळखीचा आवाज म्हणजे ‘ सचिन सचिन….’. भारतीय क्रिकेट मध्ये मानाचं नाव म्हणजे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. आज सचिनचा ५० वा वाढदिवस. अनेक भारतीयांचं लहानपण हे सचिन तेंडुलकरची प्रत्येक मॅच बघून आनंदात गेलं आहे. सचिन म्हणलं कि शतक हे समीकरण जणू ठरलेलं असायचं. आज वाढदिवसानिम्मित जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिगदर्शक, लेखक प्रवीण तरडे हे देखील सचिनचे खूप मोठे फॅन असल्याचं सांगून एक किस्सा शेअर केला आहे.(Pravin Tarde Sachin Tendulkar incident)

बलोच या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी त्यांनी हा किस्सा सांगितलं आहे. प्रवीण यांनी सांगितले कि त्यांना लहानपणापासून सचिनच्या क्रिकेटचे वेड आहे. भारताच्या एका मॅच दरम्यान प्रवीण यांचे १२वी चे पेपर चालू होते पण मॅच असल्यामुळे प्रवीण १२वीचा पेपर सोडून घरी आले होते. प्रवीण म्हणाले त्यांचं असं मानानं होत कि मी मॅच बघितली नाही तर सचिन लवकर आऊट होणार म्हणून त्यांनी एक ही मॅच सोडली नाही.
प्रवीण तरडे यांचं क्रिकेट आणि सचिन प्रेम हे त्यांच्या या कृतीतून दिसून येत.

हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’


मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या दमदार चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्या नंतर आता लवकरच प्रवीण तरडे यांचा ‘बलोच’ हा पानिपतच्या युद्धानंतरची परिस्थती मांडणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाजलेल्या युध्दांमधली एक लढाई आपण सगळ्यांनीच लहानपणा पासून ऐकली असेल ती म्हणजे ‘पानिपतची लढाई’. पानिपतच्या लढाईत मराठयांचा झालेला पराभव सुद्दा एक क्रांती होती असं म्हणणारा हा चित्रपट आहे.(Pravin Tarde Sachin Tendulkar incident)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Fitness Freak Celebrities
Read More

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय योगा फ्रिक अभिनेत्री

योग ही एक जीवनशैली आहे. योगामुळे श्वासावरचं नियंत्रण, मानसिक शांतता या गोष्टींमध्ये खूप फरक पडतो. सर्वसामान्यांसपासून कलाकार मंडळींपर्यंत…
Queen of 80s faced worst things
Read More

शूटिंगदरम्यान जबरदस्ती केल्याने ‘या’ अभिनेत्रीने ठोकला सिनेविश्वाला रामराम

या घटनेनंतर अचानक अर्चना रुपेरी पडद्यावरून गायब झाली. करियरच्या टर्निंग पॉइंटवर असतानाच अर्चनाने लग्नाचा निर्णय घेतला आणि ती थेट अमेरिकेत स्थायिक झाली.
Mahesh Kothare Nilima Kothare
Read More

“खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर!” महेश कोठारेंना दिली पत्नीने धमकी

पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.
Dattu More Wedding News
Read More

‘म्हणून दत्तूने खाल्ला समीरचा ओरडा’ पाहा दत्तू ने लग्नाची बातमी सांगितल्यावर काय होत्या हास्य जत्रेतील मित्रांच्या रिअक्शन

अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो…
Ashok saraf Sulochana Latkar
Read More

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केले सुलोचना लाटकर कुटुंबियांचे सांत्वन

सुलोचना लाटकर यांच्या अंत्यदर्शनाला अभिनेते सचिन पिळगांकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ तसेच राजकीय क्षेत्रातून मनसे अध्यक्ष