सिनेविश्वातील असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी सारखे कपडे घातले तर ते नेटकऱ्यांच्या चांगलेच तावडीत सापडतात. कलाकार ही माणूसच आहे त्यामुळे या कलाकारांच्या ही आवडी निवडी सारख्या असल्या तर त्यात कमी पणा येण्यासारखं काहीच नाही. मात्र या कलाकारांनी असं काही केलं तर नेटकरीही त्यांना सुनावल्यावाचून राहत नाहीत. या सगळ्यात मराठी छोटा पडदा गाजवणाऱ्या दोन अभिनेत्री कैचीत सापडल्यात.(Girija Prabhu Tanvi Mundale)
पहा चाहत्याने काय केलीय कमेंट (Girija Prabhu Tanvi Mundale)
भाग्य दिले तू मला मालिकेतील कावेरी म्हणजे अभिनेत्री तन्वी मुंडले. मालिकेतील राज आणि कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमधील भाग्य दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतेय. कलर्स मराठी अवॉर्डला या मालिकेतील कलाकारांनी भरजरी ड्रेस घालून उपस्थिती लावली होती. यावेळी राज कावेरीची जोडी खूपच सुंदर दिसत होती. त्यांच्या फोटोशूटचे फोटो तन्वीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान या फोटोखालील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
तन्वीने तिचा सहकलाकार विवेक सांगळेसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. दरम्यान फोटोखालील एका युजरच्या कॅप्शनने सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. एका युजरने कमेंट करत म्हटलंय, Same girija Prabhu ne pn yach dress vr photos upload केला आहे.
अभिनेत्री गिरीजा प्रभू आपल्याला सुख म्हणजे नक्की काय करते मालिकेत गौरीच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. गिरिजाने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. गिरिजाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यांत तिने सेम टू सेम तन्वी मुंडले सारखा ड्रेस परिधान केला आहे. दोघींनी सारखाच ड्रेस घालून फोटोशूट केल्याने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय.(Girija Prabhu Tanvi Mundale)
छोट्या पडद्यावरील सर्वच मालिका या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारे पात्र हे प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहतात. त्यामुळे त्यांच्या पडद्याबाहेरील वा वैयक्तिक हालचालींवर रसिक प्रेक्षक जास्त लक्ष ठेवून असतात.