शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आता बंद करा ही मालिका”, ‘सातव्या मुलीची…” मालिकेच्या कथानकावर नेटकरी भडकले, कमेंट्स करत म्हणाले, “अंधविश्वास, जादूटोणा प्रवृत्त…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 10, 2024 | 6:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial audience give their response by making negative comments

“आता बंद करा ही मालिका”, ‘सातव्या मुलीची...” मालिकेवर नेटकरी भडकले, कमेंट्स करत म्हणाले, “अंधविश्वास, जादूटोणा प्रवृत्त...”

छोट्या पडद्यावरील मालिका या अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. त्यामुळे प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकांबद्दल, मालिकांमधील पात्रांबद्दल त्यांना आवडत असलेल्या किंवा आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. मालिकेतील पात्र, मालिकेची कथा आवडत असल्यास त्यावर आपलं मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही, तर त्याबद्दल ते आपली नाराजीही व्यक्त करतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका.

मालिकेत नुकतेच एक मोठे वळण आले असून या नवीन वळणामुळे ही मालिका अनेकांच्या नाराजीचे कारण झाली आहे. रुपालीला संमोहित करण्याची शक्ती मिळाली असून या शक्तीद्वारे तिने घरतील सर्वच सदस्यांना वश केलं आहे. विरोचकांच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा व इंद्राणी या त्रिनयना देवीच्या लेकींना लढताच येतं नाही आहे आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना खटकत आहे. त्यामुळे प्रेक्षकांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – बिकट परिस्थितीत गाठला मिलियन व्ह्यूजचा टप्पा, ‘गुलाबी साडी’च्या संजू राठोडचा प्रवास आहे इतका खडतर, म्हणाला, “भाडं भरायलाही पैसे नव्हते…”

अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये राजाध्यक्ष कुटुंबियांना विरोचकाच्या तावडीतून सोडवता येत नसल्यामुळे नेत्रा हतबल झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “मालिकेतली विकृती खूपच वाढली आहे, बघवत नाही आता. अंधविश्वास आणि जादू टोण्याला प्रवृत्त करणारी मालिका” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “मालिकेची कथा ही अजिबात पुढे जाणारी नसून मालिकेत तेच तेच दाखवले जात आहे.”

आणखी वाचा – मनोरंजन क्षेत्रापासून लांब राहूनही ‘ही’ अभिनेत्री कमावते करोडो रुपये, मुंबई ते डेहराडूनपर्यंत आहे एवढी संपत्ती, सध्या करते काय?

तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली “बंद करा ही मालिका, एक भरकटलेली मालिका, कथानकाला काही ताळतंत्रच नाहीये, अरे देवा, एवढी राक्षसी वृत्ती?, त्रिनयना देवी कधी जागी होणार?, कृपया आता बंद करा ही मालिका, ही मालिका आता अजिबात बघवत नाहीये” अशा अनेक कमेंट्स करत मालिके व सध्या सुरु असलेल्या कथानकाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
11 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सिंह, मकरसह ‘या’ राशीच्या लोकांवर असणार शनिदेवाची कृपा, तर ‘या’ राशींच्या लोकांची होणार आर्थिक अडचण, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.