मंगळसूत्र म्हणजे पवित्र असे सूत्र. या दोन अर्थाने मंगळसूत्र नाव तयार झाले आहे. मंगळसूत्र हे लग्न झालेल्या स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा अलंकार मानला जातो. भारतामधील हिंदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला खूप जास्त महत्व आहे. जसा काळ बदलत चाललाय तसे अनेक प्रकारची मंगळसूत्रे बाजारात येतात. मध्यतंरी हातामध्ये घालणारे मंगळसूत्र सुद्धा बाजारात आले होते.हा ट्रेंड फॉलो करताना अनेक महिला दिसल्या होत्या. परंतु हेच मंळसूत्र जर का आपल्या जवळच्या व्यक्तीने एका स्त्रीला दिले, तर त्याचे महत्वचं काही वेगळे असते. मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिला सुद्धा तिच्या जवळच्या व्यक्तीने खास मंगळसूत्र भेट म्हणून दिले आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती. (Shivani Rangole received Gift)

गेल्यावर्षी शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी लग्न गाठ बांधली. विराजस आणि शिवानीच्या लग्नाची बरीच चर्चा देखील रंगली. विराजस हा जेष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. परंतु मृणालला भेट वस्तू देणारी सासूबाई मृणाल या नसून, तिच्या आज्जी सासूबाई आहेत. शिवानीच्या आज्जीसासूबाईंनी थेट कोल्हापूरवरून शिवानीसाठी भेट म्हणून मंगळसूत्र पाठवले आहे. या बद्दलची पोस्ट शिवानीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
हे देखील वाचा: शिव-वीणाचे सारखेच कपडे,पुन्हा एकत्र…चर्चेला उधाण
शिवानीने मंगळसूत्रासोबत एक फोटो पोस्ट केलाय. आणि या पोस्टला शिवानीने “डोरलं, ते ही कोल्हापूर च्या महालक्ष्मी मंदिराजवळ घेतलेलं! वीणा आज्जी म्हणजेच माझ्या आजे सासूबाईंनी दिलेली सुंदर भेट!” असे कॅप्शन दिले आहे. शिवानीचं हे मंळसूत्र चाहत्यांना देखील आवडल्याचं त्यांनी कमेंट मध्ये सांगितलं आहे. (Shivani Rangole received Gift)
हे देखील वाचा: अरुंधती, संजना आणि आता अनिरुद्धच्या आयुष्यात नव्या स्त्रीची होणार एन्ट्री?आई कुठे काय करते मालिकेत येणार नवीन वळण!
शिवानी सध्या अपल्याला “तुला शिकवीन चांगलाच धडा” या मालिकेत ह्रिषीकेश शेलार याच्या सोबत स्क्रिन शेअर करत आहे. या मालिकेत जेष्ठ अभिनेत्री कविता लाड ह्या शिवानीची सासू या मालिकेत साकारत असून, यात त्यांची नेगीटिव्ह भूमिका आहे. याच बरोबर तिचा सहकलाकार ह्रिषीकेश तिच्या नवऱ्याची भूमिका साकारताना दिसतोय. ह्रिषीकेशने या आधी “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेत “दौलत” या नकारात्मक पात्राची भूमिका साकारली होती.