छोट्या पडद्यावरील सहज सुंदर अभिनयामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री वीणा जगताप तिला खरी ओळख ही बिगबॉस मराठीमुळेच मिळाली.बिग बॉस मराठीमुळे तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच तीची पर्सनल लाईफ देखील उलघडली. यावेळेस शिव आणि वीणा यांचं प्रेम बहरलं होतं. त्यांनी एकमेकांच्या नावाचा टॅटू देखील गोंदवला होता. पण घराबाहेर पडल्यानंतर काही महिन्यांनी ते वेगळे झाले. पण तरीही आजही त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगतेय.वीणाने नुकतीच तिच्या आयुष्यात नवीन इनींगची सुरुवात केली. तिने प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलाय.सोशल मीडियावर असे अनेक अपडेट देत असते. नुकताच सोशल मीडियावर तिने काही फोटो शेअर केलेत. पण या फटोपेक्षा तिच्या फोटोवर शीवच्या नावाचा वर्षाव होतो.(Shiv Veena)
वीणानं मरून रंगाची भरजरी साडी, गजरा आणि मेकअपमधील सुंदर फोटो शेअर केलेत. मात्र यात तिच्या भागांत असलेलं कुंकू पाहून मात्र वीणानं लग्न केलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. पण असा फक्त तिने मेकअप केला. प्यार हुआ,,, इकरार हुआ असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर करताच किस्से हुआ प्यार असा प्रश्न थेट एका नेटकाऱ्याने विचारलाय. तर दुसऱ्याने शिवची आठवण आली का असं म्हटलंय. तर अनेकांनी शिव वीणा तुम्ही पुन्हा एकत्र या असा सल्लाही दिलाय.(Shiv Veena)

शिवने देखील नुकतंच हसलर म्हणत मरून रंगाच्या ब्लेजर मधील काही फोटो शेअर केलेत. तर हे पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या या फोटोंची तुलना वीणाच्या फोटोंशी करून ट्विनिंग केलं असं देखील म्हटलंय.नुकताच शिव हा हिंदी बिग बॉस १६चा उपविजेता ठरला. या घरात असताना देखील शिवने वीणाची आठवण काढली होती.तसेच वीण देखील शिवला पाठींबा देत होती. हे पाहून अनेक चाहते आनंदी झाले होते,तेव्हापासून आता त्यांच्यात पुन्हा काही सुरु झाले का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.तर अनेकांनी तुम्ही पुन्हा एकत्र या आणि लग्न करा असं सांगितलं. तर आता शिव आणि वीणाच्या नात्यात पुन्हा प्रेम बहरेल का? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झालेत.
हे देखील वाचा : वर्कआऊट च्या व्हिडिओ वर जान्हवी होतेय ट्रोल
