लाडक्या अभिनेत्रींपैकी एक नाव आवर्जून घेतलं ते म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलय. प्राजक्ताचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Prajakta Mali Photoshoot Troll)
प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिवाय ती जास्त लक्षात राहते ती तिच्या फोटोशूटमुळे. प्राजक्ताच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. वेगवेगळे कपडे परिधान करून, ती तिच्या हटके पोजमध्ये फोटोशूट करत असते.
पहा काय म्हणालेत प्राजक्ताच्या फोटोवर चाहते (Prajakta Mali Photoshoot Troll)
अशातच प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशूट केलय, यांत अर्थात तिचा लूक हटके आहेच. मात्र ती चर्चेत आलीय तिच्या या फोटोंवरील कमेंटमुळे. प्राजक्ताने वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये प्राजक्ताने दिलेल्या पोज वरून चाहत्यांनी तिला ट्रोल केलंय. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलंय, प्राजू ही कुठली पोझ ग तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलंय, Atta ही कोणती pose म्हणायची जी 1 no pic madhe आहे, तर आणखी एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिलंय, मुंबईला विकेट किपर पाहिजे आहे, अशा अनेक कमेंट करत प्राजक्ताच्या फोटोपोजला ट्रोल केलंय.(Prajakta Mali Photoshoot Troll)
हे देखील वाचा – शिव-वीणाचे सारखेच कपडे,पुन्हा एकत्र…चर्चेला उधाण
आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात प्राजक्ताने आपलं स्थान निर्माण केल आहे. मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती देखील मिळताना दिसते.