Shiva Serial Twist : मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट नेहमीच येताना पाहायला मिळतात. बरेचदा हे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. अशातच झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या भरभरुन मनोरंजन करतात. यापैकी शिवा या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशू-शिवामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. दिव्या-कीर्तीमुळे हे गैरसमज निर्माण झाले आणि ते वाढत गेले. मात्र, दिव्याचा नवरा चंदनने हे गैरसमज दूर करण्यासाठी शिवाला मदत केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आशुसमोर सत्य काय हे उलगडण्यास मदत झाली. आशु व नेहाच्या लग्नाच्या वेळी एक मोठा रंजक ट्विस्ट आल्याचा प्रोमो समोर आला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या या प्रोमोमध्ये आशु व शिवा यांचं लग्न झालं असल्याचं दिसत आहे. भरमंडपात आशू शिवाला घेऊन येतो. त्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर असतात तो ते पेपर फाडतो आणि अग्नीमध्ये टाकतो. हे सगळं पाहून सीताई भडकते. ती सर्वांसमोरचं आशूला जाब विचारते. त्यावर आशू तिला म्हणतो की, “हे सगळं खूप आधी करायला हवं होतं. माझं शिवावरच प्रेम आहे आणि ती माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे”. आशूचे हे बोलणे ऐकल्यानंतर सिताई म्हणते, “ही मुलगी जर घरात येणार असेल, तर ती माझ्या प्रेतावरुन येईल”. हे ऐकताच सगळेच शांत होतात.
त्यावर आशू तोडगा काढत म्हणतो, “ती समजा या घरात येणार नसेल तर मीही या घरात पाऊल ठेवणार नाही. आम्ही छोट्याशा भाड्याच्या घरात राहू, पण निदान आम्ही सुखी राहू”. यावर सिताई आशुला उत्तर देत म्हणते, “बोलणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे”. त्यावर आशू म्हणतो, “मी जेव्हा मोठा होईन ना, तेव्हा परत तुझ्याकडे येईन”, असं म्हणत तो शिवाच्या हाताला धरुन तिला घेऊन जातो. अखेर आशुने सगळ्याच्या समवेत शिवाशी लग्न केलेलं असतं. एकीकडे सीताईला हे लग्न मान्य नसलं तरी घरातील शिवा व आशुच्या बाजूने असणाऱ्या सगळ्याच मंडळींना आनंद झालेला असतो.
आणखी वाचा – ‘झापुक झुपूक’मधील सूरज चव्हाणचा पहिला लूक समोर, अगदी हिरो स्टाइल एन्ट्री, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
हा प्रोमो झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. “शिवाच्या प्रेमाखातर आशू सोडू शकेल का आपलं घर?”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. आता शिवा व आशु सीताईच्या विरोधात जात स्वतःचा नवा संसार ठरणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.