सतत चर्चेत राहणारी राखी सावंत नुकतीच तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. पाकिस्तानी अभिनेता व उद्योगपती डोडी खानबरोबर ती लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र त्यानंतर त्याने राखीबरोबर लग्न करण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी डोडीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीबरोबर लग्न करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. डोडीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे राखी सावंत पुन्हा एकदा दु:खी झाली आहे. राखीचे हे लग्न मोडल्यानंतर आता राखीचा पूर्वाश्रमीचा पती रितेश राज सिंगने तिची खिल्ली उडवली आहे. रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो राखीची खिल्ली उडवताना दिसत होता. (Ritesh Singh make fun on Rakhi Sawant broken marriage)
व्हिडीओमध्ये रितेश जोरात हसताना दिसत असून तो म्हणाला की, त्यानेच डोडी खानचा पाठलाग केला. त्याने राखीला आव्हान देत ती कधीच पाकिस्तानची सून होऊ शकत नाही, असंहे म्हटलं. जोपर्यंत तो जीवंत आहे तोपर्यंत तिला पाकिस्तानची सून होऊ देणार नाही, असेही रितेश म्हणाला. पुढे रितेश म्हणाला की, “तुला काय वाटतं? मी असाच मूर्ख बसलो आहे का? डोडी खान कधीच लग्न करणार नाही?” व्हिडीओमध्ये पुढे डोडी खान आणि राखी सावंत यांचे लग्न होऊ देणार नाही असे वचनही रितेश सिंगने दिले आहे.
आणखी वाचा – ‘झापुक झुपूक’मधील सूरज चव्हाणचा पहिला लूक समोर, अगदी हिरो स्टाइल एन्ट्री, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव
पुढे व्हिडीओमध्ये रितेशने असेही म्हटले की, राखी तेव्हाच पाकिस्तानची सून होऊ शकते. जेव्हा इतर पाकिस्तानी अभिनेत्री भारतात आल्या आणि भारतीय पुरुषांच्या दुसऱ्या पत्नी झाल्या. आपल्या लग्नाबाबत राखी म्हणाली होती की, “मला पाकिस्तानकडून बरेच प्रस्ताव येत आहेत म्हणून मी पाकिस्तानला आले आहे. त्यांनी माझ्या शेवटच्या दोन विवाहसोहळ्यात मला किती त्रास दिला हे पाहिले. मी पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा नक्कीच विचार करेन. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडपे लग्न करुन दुबई येथे स्थायिक झाले आहेत आणि चांगले जीवन जगत आहेत”.
आणखी वाचा – Shiva Serial : शिवा-आशु अडकले लग्नबंधनात, आईच्या विरोधात जात एकमेकांची निवड, प्रेमाची कबुलीही दिली अन्…
तर डोडीने या लग्नावर व्हिडीओ करत राखीला प्रपोज केले होते, कारण तो तिला चांगला ओळखतो असं सांगितलं. याबद्दल तो म्हणाला की, “राखी जी, तुम्ही माझ्या चांगल्या मैत्रीण आहात आणि नेहमीच असाल. आपण माझी पत्नी होऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही पाकिस्तानची सून व्हाल. मी माझ्या भावाशी तुमचं लग्न लावून देईन”.