रविवार, ऑगस्ट 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चिकी चिकी बुबूम बूम’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, स्वप्नील जोशी, प्रसाद खांडेकरसह इतर कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 1, 2025 | 3:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Chiki Chiki BooBoom boom Official Teaser

‘चिकी चिकी बुबूम बूम'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, स्वप्नील जोशी, प्रसाद खांडेकरसह इतर कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवणार

Chiki Chiki BooBoom boom Official Teaser : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने आजवर त्याच्या विनोदी कलेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. विनोदाचं उत्तम टायमिंग सांभाळत प्रसादने रसिक प्रेक्षकांना हसवलं. अभिनयाबरोबरच प्रसादचा दिग्दर्शनातही कल असलेला पाहायला मिळाला. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. यानंतर आता छोटा पडदा गाजवल्यानंतर प्रसाद पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवायला सज्ज होत आहे. या नव्या वर्षात त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षाखेरीस याची पहिली झलक प्रसादने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. यानंतर आता चित्रपटाच्या टीझरने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे.

‘चिकी चिकी बुबूम बूम’ असं चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या टिझरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मित्रांची रियुनियन पार्टी आणि या पार्टीदरम्यान झालेला गोंधळ आणखीनच गोंधळवून टाकणारा आहे. टीझरमध्ये कॉलेजनंतर काही मित्र एकत्र भेटायचं ठरवत असल्याचं दिसतं. एका व्हिलावर ही गॅंग भेटायचं ठरवते, मात्र या भेटीनंतर त्या व्हिलामध्ये घडणारे अनेक भयानक प्रसंग या जमलेल्या ग्रुपची कशी तारांबळ करतात हे सारं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी साऱ्यांना चित्रपट पाहावा लागेल.

आणखी वाचा – “आम्हाला त्यांना खूश करावे लागते आणि…”, चाहतीला लिप किस केल्यानंतर उदित नारायण यांचं भाष्य, म्हणाले, “आम्ही सभ्य…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘चिकी चिकी बुबूम बूम’ हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटात त्याच्यासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर, अभिजीत चव्हाण आणि अपर्णा क्षेमकल्याणी हे कलाकार झळकणार आहेत.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, तयारीला सुरुवात, तारीखही समोर

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचं लेखन प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर यांचं आहे. याशिवाय या चित्रपटाला रोहन रोहन यांचं संगीत लाभलं आहे.

Tags: Chiki Chiki BooBoom boomChiki Chiki BooBoom boom Official Teasermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jayanti 2 Teaser
Entertainment

सशक्त महिला पात्र असलेला ‘जयंती २’ येतोय, चित्रपटाच्या टिझरने वेधलं लक्ष, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 8, 2026 | 9:28 am
Pradeep Rawat passing
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे ७४व्या वर्षी निधन, सलमान खानही भावुक, म्हणाला, “अनेक चांगले…”

ऑगस्ट 6, 2026 | 10:53 am
dipika kakar ibrahim emotional
Entertainment

कॅन्सरच्या उपचारादरम्यान भावुक झाली अभिनेत्री, हॉस्पिटलमध्येच रडू लागली, म्हणाली, “माझं शरीर…”

ऑगस्ट 4, 2026 | 10:03 am
Rashmika Mandanna Injury
Entertainment

शूटिंगदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत, आठवडाभर विश्रांतीची गरज, सेट कोसळला आणि…

ऑगस्ट 1, 2026 | 11:01 am
Next Post
Suraj Chavan Movie Look

'झापुक झुपूक'मधील सूरज चव्हाणचा पहिला लूक समोर, अगदी हिरो स्टाइल एन्ट्री, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.