गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाल्व किंजवडेकर व त्याची पत्नी श्रेया डफळापुरकर यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर या दोघांनी सात फेरे घेत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. शाल्व मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कॉस्ट्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट श्रेया डफळापूरकरबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख निवडला होता. सिद्धार्थने या नवविवाहित जोडप्याबरोबरचा एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. (shalva kinjawadekar dancing video)
लग्नासाठीच्या त्यांच्या खास लूकने लक्ष वेधलं आहे. यावेळी श्रेयाने लाल रंगाची साडी आणि पारंपरिक दागिने परिधान केले आहेत. तर शाल्वने लग्नासाठी लाल रंगाची शेरवानी परिधान केली आहे. मोत्यांच्या मुंडावळ्या बांधलेल्या या नववधूवराचा खास लूक अधिक लक्षवेधी ठरत आहे. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. अशातच आता दोघे अखेर विवाहबंधनात अडकला आहे.
आणखी वाचा – प्रथमेश परबच्या बायकोला शायनिंग मारणं पडलं महागात, स्विमिंग पूलमध्ये नाश्ता घेऊन उतरली अन्…; व्हिडीओ व्हायरल
अशातच सोशल मीडियावर शाल्वच्या लग्नाचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वत:च्या लग्नात शाल्व आनंदाने नाचत आहे. गळ्यात हार असलेला, डोळ्यांवर गॉगल लावलेला आणि डोक्यावर फेटा घातलेला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाल्वच्या काही मित्रमंडळींनीदेखील त्याच्याबरोबर वरातीत ठेका धरल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबोरबर शाल्वने लग्नात श्रेया उचलूनही घेतल्याचासुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर
दरम्यान, लग्न लागताच श्रेया काहीशी भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाल्वने श्रेयाच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताच तिच्या डोळ्यांत अश्रु दाटले आणि मग शाल्वनेही तिला प्रेमाने सावरले. दोघांचा हा भावुक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या दोघांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे उत्तम प्रतिसाद दिला आहे.