सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 14, 2024 | 3:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame actor Shalva Kinjwadekar got married with Shreya Daflapurkar emotional viral on social media.

शिवा मालिका फेम शाल्व किंजवडेकर अडकला विवाहबंधनात, पत्नी श्रेया डफळापूरकर झाली भावुक, व्हिडीओ व्हायरल

झी मराठीवरील ‘शिवा’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘आशू’ म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली आणि सध्या तो ‘शिवा’ या झी मराठीवरील मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहोचलेल्या शाल्वच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळाले. शाल्व मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कॉस्ट्युम डिझायनर आणि स्टायलिस्ट श्रेया डफळापूरकरबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. (Shalva Kinjwadekar got married with Shreya Daflapurkar)

श्रेया आणि शाल्व दीर्घ काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर अनेक रोमँटिक फोटोही शेअर केलेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. ‘४ वर्षांपूर्वी मी या अद्भूत माणसाला भेटले आणि आता तो माझा होणार नवरा आहे’, असे कॅप्शन देत श्रेयाने सोशल मीडियावर साखरपुडा सोहळ्याचे खास फोटो शेअर केले होते. अशातच आता दोघे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. अशातच सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचं थाटामाटात लग्न, दोघांच्या लाल रंगाच्या आऊटफिटने वेधलं लक्ष, पहिला फोटो समोर

या व्हिडीओमध्ये शाल्वची बायको म्हणजेच श्रेया काहीशी भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाल्वने श्रेयाच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताच तिच्या डोळ्यांत अश्रु दाटले अन् शाल्वने मग तिला प्रेमाने सावरले. दोघांचा हा भावुक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या दोघांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे उत्तम प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाशी रेखा यांची गळाभेट, गालावरुन हात फिरवत विचारपूस, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापूरकर यांच्या लग्नातील पहिला फोटो शेअर केला आहे. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख केला होता. सिद्धार्थने या नवविवाहित जोडप्याबरोबरचा एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

Tags: shalva kinjawadekar and shreya daflapurkarShalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar WeddingShalva Kinjwadekar got married with Shreya Daflapurkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi Actor Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar shared a funny video of herself falling glass of juice in a swimming pool

प्रथमेश परबच्या बायकोला शायनिंग मारणं पडलं महागात, स्विमिंग पूलमध्ये नाश्ता घेऊन उतरली अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.