‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. २४ फेब्रुवारीला प्रथमेशने प्रियसी क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नापासून प्रथमेश व क्षितिजा ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो क्षितिजाबरोबरचे व त्याचे आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar funny video)
प्रथमेशची पत्नी क्षितिजा ही मनोरंजन क्षेत्रातली नसली तरी ती अनेकदा चर्चेत राहत असते. प्रथमेशबरोबर ती अनेकदा चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा काही सोहळ्यानिमित्त भेटी देत असते. तसंच सोशल मीडियावरही ती चांगले अनेकदा लिखाण करताना दिसते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. क्षितिजाने बाहेर फिरायला गेल्याचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. क्षितिजाने शेअर केलेला हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाशी रेखा यांची गळाभेट, गालावरुन हात फिरवत विचारपूस, व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एक ट्रे आहे, ज्यात काही पदार्थ असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच यामध्ये ज्यूसचा ग्लासही आहे. या व्हिडीओमध्ये क्षितिजा आनंदाने पाणी उडवत आहे. मात्र तिने पाणी उडवताच त्या ट्रेमधील ज्यूसच्या ग्लासला तिचा हात लागतो आणि त्यातील ज्यूस खाली पडतं. यामुळे तिची फजिती होते. “जेव्हा शायनिंग मारणं महागात पडतं” असं म्हणत तिने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Video : ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरने बायकोला मंगळसूत्र घालताच अश्रू अनावर, मंडपातील सगळ्यात गोड क्षण समोर
तसंच अनेकांनी या व्हिडीओखाली क्षितिजाची फजिती झाल्याबद्दल अनेक हसण्याच्या कमेंट्सही केल्या आहेत. दरम्यान, प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते.