गेल्या काही दिवसांपासून देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास फोटो शेअर करत नात्याची कबुली दिली होती. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत किरणने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर संपूर्ण मालिकाविश्वातून किरणवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. छोट्या पडद्यावर अभिनेत्याचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. तसेच त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्रीच आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती आणि अखेर तो क्षण आला आहे. (Kiran Gaikwad wedding location)
किरण गायकवाडने नुकतीच वैष्णवी कल्याणकरबरोबर साताजन्माची गाठ बांधली आहे. दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. किरणने लग्नासाठी पंधरा कुर्ता व त्यावर पायजमा आणि डोक्यावर फेटा असा लूक केला होता, तर वैष्णवीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती आणि त्यावर पिवळ्या रंगाचा शाल घेतली होती.

आणखी वाचा – प्रथमेश परबच्या बायकोला शायनिंग मारणं पडलं महागात, स्विमिंग पूलमध्ये नाश्ता घेऊन उतरली अन्…; व्हिडीओ व्हायरल
किरण व वैष्णवी यांच्या लग्नासाठी सिनेविश्वातील कलाकार मंडळी पोहोचली आहेत. त्यांचा शाही विवाहसोहळ्याचे आयोजन कोकणात सावंतवाडी पॅलेस येथे करण्यात आले आहे. इथे आजूबाजूला सर्वत्र नारळाची झाडे असल्याचे पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. पांढऱ्या रंगाच्या कपड्याने सजवलेल्या मंडपात दोघांचे लग्न झाले. तसंच त्यांच्या मंडपाला फुलांची आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती.

दरम्यान, किरण व वैष्णवी यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला असून त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नाला ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’ मालिकांमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याच्या मित्रमंडळींनी किरण-वैष्णवीच्या लग्नात धमाल मजा मस्ती केल्याचेही अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.