‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ व ‘शिवा’ या मालिकांमधून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत लोकप्रिय झाला. ‘येऊ कशी तशी…’मध्ये त्याने साकारलेलं ओम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. छोट्या पडद्यावर शाल्वचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता वैयक्तिक आयुष्यात अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर गेली अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाल्व-श्रेयाची जोडी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. अशातच आता ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. (Shalva Kinjwadekar and Shreya Daflapurkar Kelvan)
शाल्व व श्रेया यांच्या घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे. दोघांच्या केळवणाला सुरुवात झाली असून सोशल मीडियावर जोडप्याने फोटो शेअर करत याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. दोघांनी त्यांचे गोड फोटो शेअर करत “केळवण” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर श्रेयाने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये पहिल्या फोटोत शाल्व श्रेयाकडे प्रेमाने बघत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये टो तिच्या गालावर किस करत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत.
शाल्व आणि श्रेयाने २०२३ मध्ये साखरपुडा आटोपला होता. साखरपुड्यापासून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी लग्नाच्या मुहूर्ताचाही कार्यक्रम पार पडला होता. अशातच आता केळवणालाही सुरुवात झाली असून लवकरच हे जोडपे लग्नबंधनात अडकणार, हे पक्क झालं आहे. मात्र अद्याप दोघांच्या लग्नाची तारीख माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहते मंडळींना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही वर्षांपासून शाल्व आणि श्रेया रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
दरम्यान, शाल्वची होणारी बायको श्रेया ही स्टायलिस्ट असून ती तलम, तलम ऍक्सेसरीज आणि हाऊस ऑफ तक्षी या ब्रँड्सची मालक आहे. ती बँड्सच्या अंतर्गत साड्या, दागिने आणि मुलांसाठीचे कपडे डिझाईन करते. तिने अनेक सेलिब्रिटीजच्या लग्नातील आऊटफिटचं स्टायलिंग श्रेयाने केलं आहे. तर शाल्व सध्या झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.