शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वडीलांना अटक का झाली?”, राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीला लेकाने विचारला होता प्रश्न, म्हणाला, “माझ्यावर विश्वास…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 27, 2023 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Raj Kundra talks shilpa shetty says 11 year old Son about his case

"वडीलांना अटक का झाली?", राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीला लेकाने विचारला होता प्रश्न, म्हणाला, "माझ्यावर विश्वास..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या बराच चर्चेत येत आहे. लवकरच राज ‘UT 69’ हा बायोपिक चित्रपट घेऊन येत आहे. ज्यामध्ये तो स्वतःचं पात्र साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी याचं ट्रेलर प्रदर्शित झालं. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जून २०२१ मध्ये राजला एका वादग्रस्त प्रकरणात अटक झाली होती. पुढे दोन महिन्यांनी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर राज माध्यमांपासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर करत होता. त्यामुळे जेव्हा तो कुठे स्पॉट होता, तेव्हा त्याने चेहऱ्यावर मास्क परिधान केलेला असायचा. (Raj Kundra talks shilpa shetty says 11 year old Son about his case)

राज कुंद्राने २००७ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. जेव्हा राजला या प्रकरणात अटक झाली. तेव्हा या प्रकरणाचा आणि त्यावर होणाऱ्या ट्रोलिंगचा त्याच्या कुटुंबियांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्याच्या कुटुंबियांसाठी हा सर्वात कठीण काळ असल्याचा खुलासा राजने नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

हे देखील वाचा – अर्जुन-सायली देणार का गुडन्यूज? आई-बाबा होणार असल्याने कल्पनाचा आनंद गगनात मावेना, काय असेल नेमका ट्विस्ट

राज यावेळी म्हणाला, “माझी मुलगी याबाबतीत अजून लहान आहे. पण माझा मुलगा आता ११ वर्षाचा आहे. त्याच्यासाठी मी हिरो आहे. जसा त्याचा माझ्यावर विश्वास आहे, तसा माझाही त्याच्यावर विश्वास आहे. आम्ही त्याला नेहमी सांगतो की, काळजी करू नको. पण जेव्हा त्याने शिल्पाला याबद्दल विचारले, की काय झालं, कसं झालं. तेव्हा तिने ११ वर्षाच्या मुलास योग्य उत्तर दिले होते.” तसेच, शिल्पाने राजला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला उत्तर न देण्याचा सल्ला दिला होता. यावर तो म्हणाला की, “सुरुवातीला या गोष्टींचं मला प्रचंड वाईट वाटायचं. तेव्हा मी ट्रोलर्सना उत्तर देण्याचं ठरवलं होतं. पण तिने हे करण्यापासून मला रोखलं आणि यात तुझी काही चूक नसून सर्व व्यवस्थित होईल, असं मला सांगितलं.”

हे देखील वाचा – Video : लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहत्याने केली अतिफ अस्लमवर पैशांची उधळण, पुढे गायकाने ‘जे’ केले ते पाहून तुम्ही कराल कौतुक

View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@onlyrajkundra)

पुढे तो हेदेखील म्हणाला की, “मला मास्कशिवाय फिरणं चांगलं वाटतं. मात्र हे माझ्यासाठी वेगळं होतं, जे गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आयुष्यात घडत आलं. ‘चेहरा दाखवण्या लायक नाही राहिला’ अश्या प्रकारच्या अनेक कमेंट मला येत राहत होत्या. पण जर तसं घडलं असतं, तर माझ्याकडे ७० विविध प्रकारचे मुखवटे नसते.” दरम्यान, राज कुंद्राचा ‘UT 69’ हा बायोपिक येत्या ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ज्याचं दिग्दर्शन शहनवाज अली यांनी केलं आहे.

Tags: bollywood newsraj kundraRaj Kundra talks shilpa shetty says 11 year old Son about his caseraj kundra ut 69shilpa shetty
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Ranveer singh on 3 flop movies in a row

“याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.