मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 27, 2023 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranveer singh on 3 flop movies in a row

Ranveer singh on 3 flop movies in a row

बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपल्या स्वकतृत्वावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंग हे नाव आवर्जुन घेतलं जातं. रणवीरने २०१०मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात त्याच्याबरोबर अनुष्का शर्माही होती. त्यानंतर त्याने बरेच चित्रपट केले. त्याचा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. या सगळ्यात त्याचे बरेच चित्रपट हीट झाले तर काही फ्लॉपही झाले. याबद्दल त्याने भाष्य केलं आहे. नुकतीच ‘कॉफी विथ करण’ या शोच्या पहिल्या भागात रणवीरने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याचे सलग तीन चित्रपट फ्लॉप गेले होते त्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. (Ranveer singh on 3 flop movies in a row)

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या सेलिब्रिटी चॅट शोच्या ८ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. याच्या पहिल्याच भागात रणवीर सिंह व दीपिका पदुकोणने हजेरी लावली. पहिल्यांदाच ते दोघं या शोला एकत्र आले होते. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. या सगळ्याबद्दल बोलताना रणवीरने त्याच्या सलग तीन चित्रपटांच्या अयशस्वीतेबद्दल भाष्य केलं. .यावेळी रणवीर म्हणाला, “मी या काळात खूप त्रास सहन केला आहे. विशेषतः २०२२मधील ‘सर्कस’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर बरंच झेललं आहे”.

आणखी वाचा – लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली ‘ती’ गोष्ट, फोटो व्हायरल

रणवीर पुढे सांगतो, “चला मी पुन्हा तुम्हाला महामारीच्या त्या काळाकडे घेऊन जातो. साथीच्या या आजारातून बाहेर पडताना, माझ्याकडे ‘८३’ (२०२१) हा छान चित्रपट होता. ज्याला सगळ्यांनी पुरेपूर प्रेम दिलं. हा चित्रपट फक्त चुकीच्या वेळी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होण्याच्या ४८ तास आधी आम्ही बाजारपेठ गमावली होती. कारण ओमिक्रॉनमुळे सगळं बंद झालं. त्यामुळ दुर्भाग्याने एका चांगल्या चित्रपटाला खराब कामगिरीचा कलंक लागला”.

आणखी वाचा – “इथून पुढे तुझं कठीण आहे”, देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतर प्राजक्ता माळीवर चाहत्यांचा संताप, अभिनेत्री म्हणते, “काम होतं म्हणून…”

या चित्रपटानंतर रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट खूप छान व चांगल्या हेतूचा चित्रपट होता पण करोना माहामारीनंतर प्रदर्शित झाल्यामुळे तो आपटला”. त्यानंतर ‘सर्कस’ चित्रपटाबाबत बोलताना तो म्हणाला, “‘सर्कस’ चित्रपटात माझी भूमिका व जबाबदारी अगदी सीमित होती. त्यामुळे याचा पूर्णपणे दोष मी स्वतःला देऊ शकत नाही. मी सलग तीन मोठे चित्रपट फ्लॉप होताना कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे माझ्यासाठी हा धक्का खूपच नवीन होता”. रणवीरने या काळात खूप त्रास सहन केला होता असं स्पष्ट केलं पण आता तो खूप आनंदी आहे हे पण तो म्हणाला.

Tags: 3 flop moviesactor ranveer singhkaran johar showkoffee with karanranveer singhseason 8
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Reshma Shinde Troll

"एवढं किंचाळण्यापेक्षा…", 'वदनी कवळ' श्लोक वेडं-वाकडं म्हणण्यावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर भडकले नेटकरी, म्हणाले, " निदान सेलिब्रिटींनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.