बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विविध कारणांसाठी अनेकदा चर्चेत येतो. तो जेव्हा कुठे स्पॉट होतो, तेव्हा तो अनेकदा मास्कमध्ये दिसलेला असतो. त्यामुळे नेटकरी राजला ‘मास्क मॅन’ असं नाव पडलं गेलं. मध्यंतरी, राज आपल्याला एका शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना दिसला होता. अशातच तो आता एका वेगळ्या कारणांसाठी पुन्हा चर्चेत आला आहे. (UT 69 Trailer)
राज कुंद्रा याला जेव्हा जुलै २०२१ मध्ये वादग्रस्त प्रकरणात अटक झाली, तेव्हा बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तो जवळपास दोन महिने तुरुंगात होता. पुढे त्याला त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर पडला. तेव्हापासून माध्यमांपासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर करत होता. ज्यामुळे अनेकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. आता राजच्या अटकेनंतरच्या संपूर्ण घटनेवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या फोटोंमधून विवेक अग्नीहोत्रींनी करण जोहरला केलं क्रॉप, नेटकरी म्हणाले, “बालिशपणा…”
‘UT 69’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ज्याची संपूर्ण कथा ही राज कुंद्राभोवती फिरताना दिसत आहे. राजवर लागलेले आरोप, त्याला झालेली अटक आणि तुरुंगवास या संपूर्ण घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. विशेष म्हणजे, राज कुंद्रा यात स्वतःचीच भूमिका साकारणार आहे. नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने राजचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. दरम्यान, हा ट्रेलर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी राजला चांगलंच ट्रोल केलं आहे.
हे देखील वाचा – रडली, आरोप केले अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात जाताच अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यामध्ये बिनसलं, म्हणाली, “नवीन लोकांना भेटल्यावर तो…”
एए फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर, शहनवाज अली यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.