बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला होता. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात तिने साकारलेल्या ‘गंगूबाई’ भूमिकेसाठी हा पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला आहे. या सोहळ्याचे आयोजन दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजन करण्यात आलं होतं. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी आलिया भट्ट तिच्या पतीबरोबर म्हणजेच रणबीर कपूरसह या सोहळ्यात पोहोचली होती. आलिया व रणबीर ज्या जागेवर बसलेले त्याच्या पुढच्या सीटवर अभिनेत्री वहिदा रहमान बसल्या होत्या. त्यावेळी पापाराझींच्या वर्तनामुळे रणबीरला मध्ये पडावं लागलं. (ranbir Kapoor stands up for waheeda rehman)
यासंबंधीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या वर्तनाची तुलना दिवंगत अभिनेता व त्यांचे पिता ऋषि कपूर यांच्याबरोबर नेटकरी करताना दिसत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं. या सोहळ्यात त्या पहिल्या रांगेत बसलेले होते. यावेळी वहीदा रहमान यांचे फोटो काढण्यासाठी पापाराजी यांच्यामध्ये बरीच धक्का-बुक्की झालेली पाहायला मिळाली. वहिदा ज्या टेबलवर बसल्या होत्या त्या टेबललाही धक्का-बुक्की करत होते.
आणखी वाचा – “निदान आज तरी…”, शशांक केतकरची रस्त्यावरील सिग्नलबाबत पोस्ट, म्हणाला…
यावेळी रणबीर कपूर फोटोग्राफर्स यांना म्हणाले, “अरे यार धक्क-बुक्की करत आहात ते टेबल पुढे येत आहे. काय करत आहात तुम्ही?”, हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंट करत रणबीरचं कौतुक करताना दिसत आहेत.
एक नेटकऱ्याने कमेंट केली, ‘याला म्हणतात संगोपन’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, ‘जे त्याचे वडिल करायचे तेच त्याने ही केलं’ असं कमेंट करत त्याने त्याची तुलना त्याच्या वडिलांशीही केली. तसंच तो या व्हिडीओमुळे ट्रोलही बराच झाला आहे. त्याने या सोहळ्यात गॉगल घातला होता. त्यामुळे त्याने तो का घातला होता?, असाही प्रश्न त्याला कमेंट करत विचारण्यात आला.