‘बिग बॉस १७’ च्या ग्रँड प्रीमियर भागांची जोरदार सुरुवात झाली आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन या शोमध्ये कपल म्हणून सहभागी झाले आहेत. दोघांनीही शोमध्ये येण्यापूर्वीच नेहमीच एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले होते, परंतु ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच त्यांच्यात सुरु झालेल्या वादांमुळे त्यांचे मार्ग वेगळे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही या शोच्या प्रबळ स्पर्धकांपैकी एक आहे. पण पतीच्या कृत्यामुळे ती कमकुवत होताना दिसत आहे. (Ankita Lokhande On Vicky Jain)
अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र पहिल्याच भागात अंकिता पतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं. विकी घरातील इतर स्पर्धकांसोबत अधिक व्यस्त झाल्याने अंकिता त्याच्यावर नाराज झाली आहे. अंकिता ही ईशा मालवियसोबत बोलताना विकीच्या सवयीबद्दल बोलतेय, “विकीची ही सवयच आहे. जेव्हा तो नवीन लोकांना भेटतो, तेव्हा जवळच्या व्यक्तींना तो विसरतो. तो तसाच आहे आणि त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव कसा असतो माहितीये का? त्याला असं वाटतं की आज इतके लोक माझ्या बाजूने उभे आहेत”, असं अंकिता ईशाला बोलून दाखवत असते.
‘बिग बॉस १७’ चा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये अंकिता ढसाढसा रडत आहे. या प्रोमोमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनवर नाराज आहे. विकी शोमध्ये प्रत्येक स्पर्धकाला वेळ देत आहे आणि त्यामुळे तो अंकिताला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत अंकिताला आता बिग बॉसच्या घरात एकट जाणवू लागलं आहे.
या प्रोमोमध्ये अंकिता “मला दुसरं कोणी दुखवू शकत नाही. फक्त आपलीच माणसं मला दुखवू शकतात. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नाही. या खेळासाठी तूच योग्य आहेस. मला घरी जायचे आहे.” असं बोलताना दिसत आहे. अंकिताचं हे बोलणं ऐकून विकी जैनही थोडा निराश झालेला पाहायला मिळाला. तसेच तो पत्नीला समजवण्याचा प्रयत्न करतानाही दिसला.