शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2025 | 3:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
adhyayan suman on nepotism

वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला अधिक महत्त्व आहे यावरुन बरेच वाद रंगतात. स्टारकिड्सला कलाक्षेत्रात सहज काम मिळतं असा दावा अनेकदा केला जातो. काही स्टारकिड्सला पाहता थोड्याफार प्रमाणात यामध्ये तथ्य आहे असंही वाटतं. पण बॉलिवूडमधील एक स्टारकिड मात्र या सगळ्याला अपवाद आहे. सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनच्या हाती सध्या काहीच काम नाही. याचबाबत त्याने स्वतः भाष्य केलं आहे. गेली १७ वर्ष तो इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज’ चित्रपटात त्याने उत्तम काम केलं. त्यानंतर त्याच्याकजे कामच आलं नाही. २०२४मध्ये संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘हिरामंडी’ वेबसीरिजमध्ये अध्ययनने उत्तम भूमिका साकारली. मात्र या सीरिजनंतर काम येण्याची अपेक्षा होता. तसं काहीच घडलं नसल्याचं अध्ययनचं म्हणणं आहे. (adhyayan suman on nepotism)

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनने मनातील खंत बोलून दाखवली. तसेच नेपोटिझम हा शब्द उगाच मोठा करुन ठेवला आहे असं त्याचं म्हणणं आहे. ‘हिरामंडी’नंतर काम न मिळण्यावरुन अध्ययन म्हणाला, “मी नेपोटिझमचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. कारण नेपोटटिझममुळेच मला काम मिळत नाही. हे मी पुराव्यासह समोर आणू शकतो. नेपोटिझम उगाच वादाचा मुद्दा आहे. फॅशन म्हणून सतत या मुद्द्यावर बोललं जातं. ‘हिरामंडी’नंतर मला मोठा धक्का बसला. कारण मला पाहिजे तशा भूमिका मिळाल्याच नाहीत”.

आणखी वाचा – “थोडीतरी लाज बाळगा”, ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

View this post on Instagram

A post shared by Adhyayan S Suman (@adhyayansuman)

“मला वाटलं की, माझं नशिब बदलेल, मला उत्तम भूमिका मिळतील. पण असं काहीच झालं नाही. त्यानंतर मला देशातील सगळ्यात मोठ्या दिग्दर्शकाबरोबर म्हणजे संजय लीला भन्साळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण त्यानंतरही मला काम मिळालं नाही. याचा दोष मी स्वतःला की इंडस्ट्रीला देऊ?. आरामदायी, लग्जरी आयुष्य जगणं एका क्षणानंतर जेलसारखं वाटू लागतं. वडील तुम्हाला कितीही गाडी, बंगला, घर, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पेंटहाऊस दिलं तरी जेलच वाटतं”.

आणखी वाचा – बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

“माझ्यासारखा मुलगा ज्याला काम करण्याची इच्छा आहे तो दुःखीच राहतो. तुम्ही घर खरेदी केलं, कार खरेदी केली पण ती तुमची नाही. हे सगळं माझ्या वडिलांचं आहे. हे सगळं उभं करणं ही त्यांची मेहनत आहे. आता पुढे माझं काय? असा विचार मनात डोकावतोच. मी ३७ वर्षांचा असूनही माझ्याकडे स्वतःच घर नाही”. फक्त वडिलांनी कमवलेल्या प्रत्येक सुविधांचा आश्रय घेणं अध्ययनला पटत नाही. कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी तो धडपडत आहे.

Tags: bollywood newsentertainment newsshekhar suman
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bhawna Kohli Dhingra troll

अनुष्का शर्माचं नणंदेशी जमेना, भाऊही विचारत नाही अन्...; ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीच्या बहिणीचं सडेतोड उत्तर, नातं कसं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.