बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुष्का शर्माचं नणंदेशी जमेना, भाऊही विचारत नाही अन्…; ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीच्या बहिणीचं सडेतोड उत्तर, नातं कसं?

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2025 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bhawna Kohli Dhingra troll

अनुष्का शर्माचं नणंदेशी जमेना, भाऊही विचारत नाही अन्...; ट्रोल करणाऱ्यांना विराट कोहलीच्या बहिणीचं सडेतोड उत्तर, नातं कसं?

१८ वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने IPL च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. टीमच्या सगळ्या खेळाडूंसाठी तसेच विराट कोहलीसाठी हा अभिमानाचा क्षण होता. विराटचे कुटुंबियही आनंदाने नाचू लागले. आरसीबीचा सामना असताना अनुष्का शर्मा नेहमीप्रमाणे विराटला प्रोत्साहित करण्यासाठी स्टेडियमवर हजर होती. त्याचबरोबरीने त्याच्या कुटुंबातील इतर मंडळीही त्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत होते. आरसीबीच्या विजयानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. विराटची बहीण भावना कोहलीनेही त्याच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली. मात्र विराट-अनुष्काबरोबर तिचं नातं बरोबर नाही हे दाखवून देण्याच्या उद्देशाने एका नेटकऱ्याने भावनाला डिवचलं. यावरच तिने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. (Bhawna Kohli Dhingra troll)

भावनाने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली. तिने म्हटलं की, “ज्यांनी आम्हाला हसवलं, रडवलं त्या सगळ्यावर मात करत सेलिब्रिट करण्याची ही रात्र, हा क्षण आणि हे स्वप्न आहे. पण तुम्ही खूप वाट पाहायला लावली. हे खरंच सत्य घडत आहे हे शांत वातावरणात आणि एकांतात अनुभवण्याची गरज आहे. आरसीबीच्या चांगल्या आणि वाईट क्षणांमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या हजारो लोकांचे आभार, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही”.

आणखी वाचा – बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

View this post on Instagram

A post shared by Bhawna Kohli Dhingra (@bhawna_kohli_dhingra)

“कारण हा विजय प्रत्येकाचा वैयक्तिक विजय आहे. तुझं रडणं सगळ्यांनीच अनुभवलं जे तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्हीही तुझ्याबरोबर रडलो. कारण तू माझा छोटा वीरु आहेस. देवाने निवडलेला तू व्यक्ती आहेस, जो सगळ्यांना आयुष्यात प्रेरणा आणि आनंद देतोस. हे सगळं पाहून मी धन्य झाले. स्वर्गामध्ये कोणाच्या तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य आहे. ज्याला त्याच्या मुलाला पाहून गर्व होत आहे”.

आणखी वाचा – वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

भावनाच्या या पोस्टवर नेटकऱ्याने एक विचित्र कमेंट केली. “तो (विराट) त्याच्या भाषणामध्ये कधीच तुझ्या नावाचा उल्लेख का करत नाही?. तुझी कोणतीच पोस्ट लाइकही करत नाही. इतकंच काय तर अनुष्काही तुझी कोणतीच पोस्ट लाइक करत नाही”. यावर भावनाने अगदी शांतपणे कमेंटला उत्तर दिलं. ती म्हणाली, “प्रेम हे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं जातं, हे समजण्याची ताकद देव तुम्हाला देवो. तुमच्या आयुष्यातही खूप प्रेम आहे अशी आशा करते. आयुष्यात कोणतीच असुरक्षितता नसेल. फक्त खरी नाती असतील ज्यामध्ये कोणताच दिखावा नसेल. देव तुमचं भलं करो”. भावनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिचं मत मांडलं.  

Tags: bollywood newsentertainment newsvirat kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Vibhu Raghave Death

"आता वेदना होणार नाहीत", कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.