मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही एकत्र प्रवास केला अन्…”, निधनापूर्वी पूर्वाश्रमीच्या पतीला भेटली होती शेफाली जरीवाला, हरमीत म्हणाला, “गप्पा रंगल्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 2, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala ex husband share experience

“आम्ही एकत्र प्रवास केला अन्...”, निधनापूर्वी पूर्वाश्रमीच्या पतीला भेटली होती शेफाली जरीवाला, हरमीत म्हणाला, “गप्पा रंगल्या...”

सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाने अवघ्या ४२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचं निधन झालं. शेफालीच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच पती पराग त्यागीची अवस्थाही न पाहण्यासारखीच आहे. शेफालीचं जाणं कलाविश्वालाही परवडलं नाही. तिच्या अंतिम संस्काराला कलाकारांनाही रडू कोसळलं. अशातच शेफालीचा पूर्वाश्रमीचा पती हरमीत सिंहनेही भावुक पोस्ट शेअर केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरमीतने शेफालीबरोबर झालेल्या शेवटच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. तसेच निधनापूर्वी शेफाली व हरमीत भेटले असल्याचंही त्याने सांगितलं आहे. (Shefali Jariwala ex husband share experience)

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत हरमीतने शेफालीबाबत भाष्य केलं. तसेच दोघांची भेट झाल्यानंतर नेमकं काय घडलं? याविषयीही सविस्तर सांगितलं. हरमीत म्हणाला, “मला अजूनही आठवतं की, दोन ते तीन वर्षांपूर्वी मी बांग्लादेशमध्ये एका शोसाठी गेलो होतो. या शोसाठी सनी लिओनी आणि शेफाली जरीवालाही आली होती. आम्ही तिघं एका प्रायव्हेट जेटमधून परतीचा प्रवास करत होतो”.

आणखी वाचा – रश्मी देसाईंची नवी पोस्ट नेटकऱ्यांना खटकली, चार दिवसांपूर्वीच मैत्रीण शेफालीचा मृत्यू अन्…; नेटकरी म्हणाले, “मृत्यूचे दुःख…”

View this post on Instagram

A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

पुढे हरमीत म्हणाला, “प्रवास करतान आम्ही दोघं बाजू बाजूच्या सीटवर बसलो होतो. त्यादरम्यान आम्ही खूप बोललो. गप्पा मारल्या. त्याशिवाय काही पार्टी, कार्यक्रमांमध्येही आमची भेट झाली होती. तेव्हाही आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी आम्ही एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या”. शेफालीबाबत बोलताना हरमीत त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमला होता. कामानिमित्त भेटीगाठी झाल्या तर शेफाली व हरमीत एकमेकांशी संवाद साधत होते. खासगी आयुष्य कधीच त्यांनी त्यांच्या कामामध्ये आणलं नाही.

आणखी वाचा – मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्वचेसाठी ट्रिटमेंट घेतली अन्…; शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत जवळच्या मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे

२००४ मध्ये शेफालीने हरमीतसह लग्न केलं होतं. मात्र अवघ्या पाच वर्षांमध्येच त्यांचा संसार मोडला. २००९मध्ये शेफाली-हरमीतचा घटस्फोट झाला. दरम्यान शेफालीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. शारीरिक तसेच मानसिक छळ करत असल्याचं तिने म्हटलं होतं. त्यादरम्यान शेफाली व हरमीतचा वाद टॉक ऑफ द टाऊन ठरला होता. घटस्फोटानंतर काही वर्षांनी म्हणजेच २०१४मध्ये तिने पराग त्यागीसह संसार थाटला. मात्र लग्नाच्या ११ वर्षांमध्येच शेफालीने जगाचा निरोप घेतला.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Apurva Nemlekar Emotional

"कठीण काळ अनुभवला, काही कलाकार मध्येच सोडून गेले", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपताच अपूर्वा नेमळेकर भावुक, म्हणाली, "टीकेचा सामना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.