गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मी देसाईंची नवी पोस्ट नेटकऱ्यांना खटकली, चार दिवसांपूर्वीच मैत्रीण शेफालीचा मृत्यू अन्…; नेटकरी म्हणाले, “मृत्यूचे दुःख…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2025 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rashmi desai shefali jariwala

रश्मी देसाईंची नवी पोस्ट नेटकऱ्यांना खटकली, चार दिवसांपूर्वीच मैत्रीण शेफालीचा मृत्यू अन्…; नेटकरी म्हणाले, "मृत्यूचे दुःख…"

rashmi desai shefali jariwala : वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सिनेसृष्टीला धक्का बसला. बीपी कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका आला आणि अभिनेत्रीने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता. तिच्या अंतिम संस्काराला अनेक कलाकार मंडळी हजेरी होते. ‘बिग बॉस १३’ मध्ये तिच्याबरोबर दिसणारी रश्मी देसाईही अंतिम निरोप देण्यासाठी आली होती. शेफालीच्या जाण्याला चार दिवस होत नाहीत तोवर रश्मीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी प्रचंड रागवले आहेत. अभिनेत्रीला पोस्टमध्ये आनंदात पाहताच नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे.

रश्मी देसाई हिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने डेनिमसह पांढरा रंगाचा शर्ट घातला आहे. ती हसतमुख, बहरताना दिसत आहे आणि ग्लॅमरस पोझ देत आहे. तिचे हे फोटो पाहून ती चाहत्यांना आनंददायक असल्याचं वाटतंय, परंतु नेटकऱ्यांनी तिला तावडीत धरलं आहे. एकाने लिहिले, “मैत्रीण जाऊन चार दिवस झाले नाहीत आनंदी असल्याच्या पोस्ट करतेय”. दुसर्‍याने कमेंट करत म्हटलं आहे की, “तिच्या मृत्यूनंतर ती धीर धरत असेल”. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “दोन दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या मृत्यूचे दु:ख आणि आज हे सर्व फोटो? शेफाली जरीवाला विचार करेल? आपण सर्वजण ढोंग करत आहात”.

आणखी वाचा – “हार्डवेअर ठीक पण सॉफ्टवेअर खराब”, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर बाबा रामदेवांचे त्वचेच्या ट्रीटमेंटबाबत भाष्य, म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

शेफालीचा मृत्यू २७ जून २०२५ रोजी रात्री झाला. तिचा नवरा पराग त्यागी तिला रुग्णालयात घेऊन गेला, परंतु तोवर तिला मृत घोषित करण्यात आले. काही अहवालात असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी रिकाम्या पोटात किंवा शिळ्या अन्नावर एजिंग औषध घेतले, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आला. ती फक्त ४२ वर्षांची होती.

आणखी वाचा – सत्यनारायण पूजेचा उपवास, फ्रिजमधील अन्न खाल्लं अन्…; शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण उघड, शिळं खाणं पडलं महागात

शेफाली जरीवाला यांनी घरी सत्यानारायण पूजेसाठी उपवास केला, ज्यात तिचे आई-वडील देखील उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पराग त्यागी म्हणाले की, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ल्यानंतर ती बेहोश झाली. शुक्रवारी रात्री मुंबईत शेफाली जरीवाला यांचे निधन झाले. ती ४२ वर्षांची होती. ‘कांटा लगा’ स्टारला तिचा नवरा पराग त्यागी आणि तीन जवळच्या लोकांनी मुंबईतील बेल्लेव्ह्यू मल्टिपेशिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

Tags: rashmi desaiShefali JariwalaShefali Jariwala Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Shefali Jariwala ex husband share experience

“आम्ही एकत्र प्रवास केला अन्...”, निधनापूर्वी पूर्वाश्रमीच्या पतीला भेटली होती शेफाली जरीवाला, हरमीत म्हणाला, “गप्पा रंगल्या...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.