शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार वर्षांनी शशांक-मृणाल यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष, चाहतेही खुश

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar and Mrunal Dusanis starrer Sukhachya Sarini He Man Baware Marathi serial re release

शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस यांची ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मराठी मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित होणार

कलर्स मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वी आलेली ‘सुखांच्या सरीने हे मन बावरे’ या मालिकेने प्रेक्षकांची चांगलीच मनं जिंकली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षकगीतदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी अनु व सिद्धार्थ म्हणजेच अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस हे दोघे तर प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. शशांक व मृणाल यांचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्गदेखील आहे.  (Sukhachya Sarini He Man Baware Rerelease)

हे मन बावरे’ मालिका २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर २०२० मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप केला. जवळपास दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जायची. ही मालिका संपून चार वर्षे झाली असली तरीही सिद्धार्थ-अनुच्या जोडीने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अशातच या मालिकेच्या अनेक चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “अजितदादा म्हणाले तिजोरीत खडखडाट पण…”, मराठी कलाकारांच्या पेन्शनवरुन सविता मालपेकरांचं मोठं विधान, म्हणाल्या, “लाज वाटते की…”

नुकताच कलर्स मराठी वाहिनीवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे आणि या मालिकेच्या पुन:प्रसारणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. “प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार, सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार! नक्की बघा” असं म्हणत या मालिकेच्या पुन:प्रसारणाबद्दल प्रेक्षकांना माहिती देण्यात आली आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका येत्या नोव्हेंबरपासून दुपारी १ वाजता फक्त कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार”.

आणखी वाचा – लोकप्रिय बॉलिवूड गायकाच्या कॉन्सर्टसाठी तेलंगणा सरकारकडून नोटीस, ‘या’ गाण्यांवर घातली बंदी, नेमकं असं काय झालं?

दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील मुख्य कलाकार म्हणजे अभिनेता शशांक केतकर व अभिनेत्री मृणाल दुसानीस सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. शशांक हा मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे तर मृणाल लवकरच १६ डिसेंबरपासून, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी तिचे अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच आता तिच्या एका जुन्या मालिकेचेही पुन:प्रसारण होणार आहे.

Tags: mrunal dusanisshashank ketkarSukhachya Sarini He Man Baware Rerelease
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : 'पारू' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, दिसणार 'ही' अभिनेत्री, किर्लोस्कर कुटुंबात वादळ म्हणून येणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.