Paaru Marathi Serial Update : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सध्या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत पारुमुळे अहिल्यादेवींवर होणार हल्ला टळला आहे. त्यामुळे पारू सगळ्यांच्या नजरेत मोठी झालेली पाहायला मिळाली. तर आदित्यनेही पारूचं कौतुक केलं. इतकंच नव्हे तर यापुढे कधीही अविश्वास दाखवणार नाही असंही तो म्हणाला. तर पारू मालिकेत दिशा नावाचं वादळ पुन्हा घोंगावताना दिसत आहे. दिशाचा किर्लोस्कर घराचा नाश करण्याचा अयशस्वी झाला आहे. त्यामुळेच आता दिशा पुन्हा एकदा सूड घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रकरणात दिशाला एक महिला मदत करताना दिसली आहे.
बरेच दिवसांपासून दिशाला मदत करणारी ती महिला नेमकी कोण आहे असा प्रश्न भंडावून सोडत होता. अशातच मालिकेत एका पात्राची एंट्री झाली आहे. ही एंट्री नेमकी कोणाची आहे हे गुपित अखेर उलगडलं असल्याचं समोर आलं आहे. मालिकेत अभिनेत्री श्वेता खरातची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस आर्किटेक्चर अनुष्काची मालिकेत हवा झाली. अखेर आज या अनुष्काचा चेहरा समोर आला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये एक्झिबिशनमध्ये १०० वर्ष जुन्या पेंटींगचा लिलाव होतो. यावेळी अहिल्यादेवी १ करोड रुपये किंमत लावतात. त्यावर अनुष्काची एंट्री होते. अनुष्का अहिल्यादेवींनी क्रॉस करत १ करोड २५ लाखांची किंमत लावते.यावर अहिल्यादेवी अनुष्काला म्हणतात, “महागात पडला तुला हा सौदा”. यावर अनुष्का अहिल्यादेवींना उत्तर देत म्हणते, “सौदा करणं मी तुमच्याकडून शिकली आहे. तुमच्यामुळे जिंकली आहे मी हा सौदा”.
प्रोमो पाहून आता अनुष्काने केलेला हा सौदा नक्की कोणाला भारी पडणार आहे असा प्रश्न पडला आहे. जिंकण्याचा श्रेय अहिल्यादेवींना देणारी ही अनुष्का नक्की आहे तरी कोण हा प्रश्नही साऱ्यांना भंडावत आहे. इतकंच नाही तर अनुष्का व दिशाचं नेमकं काय कनेक्शन असेल हे सुद्धा गुपित ठेवण्यात आलं आहे.