प्रिया च्या फोटोवरील नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

Priya Marathe And Shantanu Moghe
Priya Marathe And Shantanu Moghe

मालिका विश्वात स्वतःच्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. मराठी सोबत हिंदी मालिकांमध्ये देखील प्रियाने तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे.या सुखांनो या, चार दिवस सासूचे, कसम से ,पवित्र रिश्ता या मालिकांमध्ये प्रिया पहायला मिळाली. सकारत्मक भूमिकांपेक्षा प्रियाची तू तिथे मी या मालिकेतील नकारत्मक भूमिका जास्त गाजली त्या नंतर आता प्रिया स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही खलनायिका साकारताना पहायला मिळतेय. तिच्या या भूमिकेला ही चांगलीच पसंती मिळाली आहे,इट्स मज्जाला दिलेल्या इंटरव्यू मध्ये प्रियाने हे सांगितले आहे कि प्रेक्षक आता शिव्या घालतात आणि नेगटीव्ह भूमिकेची हीच पावती आहे.(Priya Marathe And Shantanu Moghe)

प्रिया मराठे ही अभिनेता शंतनू मोघे याची पत्नी आहे.ती तिच्या सोशल मीडियावर त्या दोघांचे बरेच फोटोज, व्हिडिओ पोस्ट करत असते. तसेच ते दोघे कायम एकमेकांना अँप्रिशिएट करत असतात आणि त्यांच्या सोशल मीडिया वरून ते व्यक्त देखील करतात.हल्लीच शंतनूने त्याच्या सफरचंद या नाटकाचा प्रयोग वॉकर घेऊन पाडला होता तेव्हा प्रियाने त्याच्या साठी केलेली पोस्ट फारच चर्चेत होती.

पहा शंतनूने काय कमेंट केली (Priya Marathe And Shantanu Moghe)

तसेच प्रिया वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट्स देखील करते.तिचे हे फोटोज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. असाच एक जांभळ्या रंगाच्या साडीवरचा फोटो लाईफ इज नॉट परफेक्ट बट माय सारी प्लेट्स कॅन बी असे कॅप्शन देत तिने शेअर केला आहे. या लुक मध्ये ती फारच सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोज वर तिच्या चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्स देखील आल्या आहेत पण या सगळ्यात एक कमेंट आपलं लक्ष वेधून घेते. ती म्हणजे शंतनू ची. त्याने प्रियाच्या या फोटो वर कमाल अशी कमेंट केली आहे.आणि त्या वर प्रिया ने शंतनूला स्वीटी असा रिप्लाय देखील केला आहे.(Priya Marathe And Shantanu Moghe)

photo credit: instagram priya marathe

शंतनू हा देखील अभिनेता आहे. स्वराज्य रक्षक संभाजी ही त्याची गाजलेली मालिका आहे, तसेच स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत तो अविनाश ही भूमिका साकारतो आहे.छोट्या पडद्याप्रमाणे प्रियाने ती आणि इतर,विघनहर्ता यांसारखे चित्रपट देखील केले आहेत.

हे देखील पहा : वाॅकर घेऊन शंतनू मोघेंनी पार पडला प्रयोग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Shivani Sonar Photoshoot
Read More

‘बाकी सब मोह माया है।’ शिवानीच्या लूकने झाली मालिकेची आठवण

शिवानीच्या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय, पहिला फोटो पाहून संजुची आठवण आली.
Prajakta Mali Bold Photoshoot
Read More

प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मराठी सिने सृष्टीमध्ये प्राजक्ता माळी हिने…
Genelia post for Rahyl
Read More

‘तुला आता चालण्यासाठी माझी गरज नाही’…लेकाच्या वाढदिवसनिमित्त जिनिलीयाचा खास सल्ला

सिनेसृष्टीमधील लाडक कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख अवघ्या महाराष्ट्राने दादा-वहिनी म्हणून या जोडप्याला त्यांच्या मनात महत्वाचं…
Celebrity Couple Age
Read More

वयात जास्त अंतर असूनही हे सेलिब्रिटी कपल करतायत सुखाचा संसार

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल बद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. बरं या कलाकारांच्या वयात मोठं अंतर असूनही…
Siddharth Mitali Vacation Mode
Read More

सिद्धार्थ-मितालीची Disneyland ट्रीप

मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि नेहमीच चर्चेत असणार क्युट कपल म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली…