बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ता माळीने फार्महाऊससाठी खर्च केले लाखो रुपये, म्हणाली, “दुनिया गेली तेल लावत पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 15, 2023 | 6:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prajakta mali farmhouse

प्राजक्ता माळीने फार्महाऊससाठी खर्च केले लाखो रुपये, म्हणाली, “दुनिया गेली तेल लावत पण...”

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्राजक्ता माळीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. प्राजक्ताने अधिकाधिक मेहनत करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं बळकट स्थान निर्माण केलं. ती इथवरच थांबली नाही तर व्यावसायिक क्षेत्रामध्येही प्राजक्ताने पाऊल ठेवलं. तिने स्वतःचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. प्राजक्ता आता बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटांकडे वळली आहे. इतकंच नव्हे तर तिने स्वतःचं कर्जतमध्ये फार्महाऊस उभारलं. याचविषयी तिने आता ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना भाष्य केलं.

प्राजक्ताचा ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याच चित्रपटाच्यानिमित्ताने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय प्राजक्ताने तिच्या कर्जतमधील फार्महाऊसबाबत खुलासा केला.

आणखी वाचा – “मसाज करणाऱ्या बाईने मला…”, वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, “माझ्या शरीराबाबत…”

“‘दुनिया गेली तेल लावत’ ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. पण प्राजक्ताने कोणता निर्णय घेताना ‘दुनिया गेली तेल लावत’ असं स्वतः सांगितलं?” असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, “माझं फार्महाऊस. आतापर्यंतची सगळी पुंजी मी यामध्ये गुंतवली. एफडी, म्युचअल फंड, गोल्ड लोन सगळं काही मी फार्महाऊससाठी खर्ची केलं”.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – Video : ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवधूत गुप्तेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“त्याक्षणी मला असं वाटलं दुनिया गेली तेल लावत. एखादी गोष्ट आवडली आहे तर विचार करण्यामध्ये काय अर्थ?. एखादी गोष्ट न करण्याचं मला जास्त दुःख होतं. म्हणून मी जे ठरवलं ते केलं. कर्ज काढून शक्य होतं तेही झालं”. प्राजक्ताने तिच्या फार्महाऊस तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. तिच्या आलिशान फार्महाऊसचे फोटो पाहून चाहत्यांनीही प्राजक्ताचं कौतुक केलं.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actressprajakta mali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
why vishakha subhedar quit maharashtrachi hasyajatra show

“मला फटकारलं, टोमणे मारले अन्…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यावरुन विशाखा सुभेदारचं भाष्य, म्हणाली, “कोणी मला जज करावं हे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.