बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे ती किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची. या चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच बरीच चर्चा होता. शाहरुखचे चाहते तर या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केली. पहिल्याच दिवाशी चित्रपटाने तब्बल ७२ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला जगभरातील चाहत्यांकडून बराच प्रतिसाद मिळत आहे. जगभरात या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आजही हा चित्रपट पहायला प्रेक्षक बरीच गर्दी करत आहेत. नुकतीच जवान चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने पत्रकार परिषद घेतली. त्यात शाहरुखने दीपिका कशाप्रकारे मुर्ख बनवलं याचा खुलासा केला. (Shahrukh share experience about deepika)
नुकतीच चित्रपटाच्या यशानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या चित्रपटाची संपूर्ण टीम येथे उपस्थित होती. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. यावेळी पूर्ण टीमने जवानच्या गाण्यावर ठेका धरला. या पत्रकार परिषदेत शाहरुखने दीपिकाचा एक किस्सा शेअर केला. तिला कशाप्रकारे शाहरुखने मुर्ख बनवलं हे सांगताना तो म्हणाला, “तिला असं वाटत होतं की ती एक छोटीशी भूमिका करायला आली आहे. पण आम्ही तिला मुर्ख बनवलं व तिच्याबरोबर संपूर्ण चित्रपट शूट केला. यासाठी दीपिकाचे खूप धन्यवाद. प्रेक्षकांसाठी अशा प्रकारचा चित्रपट बनवताना मला खूप आनंद झाला”.
यावर प्रतिक्रिया देताना दीपिका म्हणाली, “मी हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टच्या चित्रीकरणासाठी व्यस्त होते. यावेळी तिथे अॅटली व शाहरुख आले होते. त्यांनी मला चित्रपटाची कथा सांगितली. या चित्रपटात माझं पात्र केवढं आहे याने मला काहीही फरक पडत नाही. मी फक्त या चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या प्रभावाचा विचार करत होते”.
आजपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरीच धुमाकूळ घातली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई केली. पहिल्याच दिवशी ७२ कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने नवीन रेकॉर्ड बनवले. हिंदीसह तमिळ व तेलगू भाषेतही या चित्रपटाने बरीच कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ३४५.५८ कोटींची कमाई नोंदवली आहे.