शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ऐश्वर्या नारकर नक्की कसं आयुष्य जगतात?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण दिवसाचं शेड्युल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 14, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar

ऐश्वर्या नारकर नक्की कसं आयुष्य जगतात?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण दिवसाचं शेड्युल

Aishwarya Narkar : कलाकार मंडळींचं रोजचं रुटीन नेमकं कसं असतं असा प्रश्न त्यांच्या चाहते मंडळींना सतत पडलेला असतो. इतकंच नव्हे तर त्यांच्या आयुष्याबाबतही जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. विशेषतः ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चाहत्यांसह गोष्टी शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या आयुष्यातील दिनचर्येचे व्हिडीओ शेअर करतात. चित्रीकरणामुळे व्यस्त श्येड्युलचा एक व्हिडीओ एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मालिकाविश्वात नेहमीच चर्चेत असणारी ऐश्वर्या नारकर आहे.

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – डोळ्यांवर, हातावर जखमा घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती ऐश्वर्या राय, अभिनेत्रीची ‘ही’ अवस्था पाहून नेटकरीही थक्क, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या व्यस्त दिवसाच्या दिनचर्येचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या या सकाळी सहा वाजता उठून योगा करताना दिसत आहेत. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास त्या शूटिंगला जाण्याची तयारी करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंगने घेतली थेट मुकेश खन्ना यांची भेट, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाले, “त्याने २ तास प्रयत्न केला पण…”

पुढे ऐश्वर्या शूटिंगसाठी घराबाहेर पडून त्यांच्या गाडीने सेटवर जाताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्या दिवशी आउटडोर शूट असल्याने त्या रोडवे शूट करताना दिसत आहेत. शूटिंगदरम्यान ३च्या सुमारास त्या कॉफी पिताना दिसत आहेत. एकूणच अभिनेत्रीच हे बिझी श्येड्युल पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली आहे.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar Videomarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
mukesh khanna on akshay kumar

"फक्त मिशी लावून कोणीही पृथ्वीराज चौहान होत नाही", मुकेश खन्नांचा अक्षय कुमारला टोमणा, म्हणाले, "तो दोषी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.