Aishwarya Narkar : कलाकार मंडळींचं रोजचं रुटीन नेमकं कसं असतं असा प्रश्न त्यांच्या चाहते मंडळींना सतत पडलेला असतो. इतकंच नव्हे तर त्यांच्या आयुष्याबाबतही जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. विशेषतः ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चाहत्यांसह गोष्टी शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी नेहमीच त्यांच्या आयुष्यातील दिनचर्येचे व्हिडीओ शेअर करतात. चित्रीकरणामुळे व्यस्त श्येड्युलचा एक व्हिडीओ एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मालिकाविश्वात नेहमीच चर्चेत असणारी ऐश्वर्या नारकर आहे.
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मराठी मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असली तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईला लाजवणारा आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. आपल्या हटके अभिनयानं त्या सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसतात. सध्या ऐश्वर्या या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
सोशल मीडियावर ऐश्वर्या बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या व्यस्त दिवसाच्या दिनचर्येचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या या सकाळी सहा वाजता उठून योगा करताना दिसत आहेत. त्यानंतर सव्वा आठच्या सुमारास त्या शूटिंगला जाण्याची तयारी करताना दिसत आहेत.
पुढे ऐश्वर्या शूटिंगसाठी घराबाहेर पडून त्यांच्या गाडीने सेटवर जाताना दिसत आहेत. इतकंच नाही तर त्या दिवशी आउटडोर शूट असल्याने त्या रोडवे शूट करताना दिसत आहेत. शूटिंगदरम्यान ३च्या सुमारास त्या कॉफी पिताना दिसत आहेत. एकूणच अभिनेत्रीच हे बिझी श्येड्युल पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली आहे.