Aishwarya Narkar On Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाचा अंतिम सोहळा दिमाखात पार पडताना पाहायला मिळणार आहे. या सीझनच्या विजेतेपदावर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह गायक, रॅपर, रील स्टार यांना देखील खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. या विविध कलाक्षेत्रातील कलाकारांनी हे पर्व विशेष गाजवलं. घरातील वाद-विवाद, प्रेम, मैत्री यांनी एक उंची गाठलेली पाहायला मिळाली. स्पर्धकांचे टास्क आणि त्यांच्या खेळाचं कौतुक झालेलं पाहायला मिळालं.
यंदाच्या या पर्वातील स्पर्धकांच्या चुकांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या दिसल्या. अनेकांना ट्रोलही करण्यात आलं. तर काहींनी ज्येष्ठ स्पर्धकांचे केलेले अपमान पाहून सिनेविश्वातील कलाकारांनीही स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या चुका लक्षात घेता अनेक कलाकारांनी यावर सडेतोडपणे मत मांडत भाष्य केलेलं दिसलं. आता या पाठोपाठ मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीनेही ‘बिग बॉस’बाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर हटके रील व्हिडीओ शेअर करत त्या नेहमीच प्रेक्षकांच्या नजरेत येतात. अनेकदा त्यांना या रील व्हिडीओवरुन ट्रोलही करण्यात आलं आहे, मात्र वेळोवेळी त्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसल्या आहेत. ऐश्वर्या या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यात “बिग बॉस’ची ऑफर आली तर स्वीकारणार का?”, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना केला आहे. या प्रश्नाचं ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरत आहे. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर ‘नाही’ असं उत्तर त्यांनी दिलं आहे.