Bigg Boss 18 : सलमान खानचा बहुचर्चित शो ‘बिग बॉस १८’ची सगळेच वाट पाहत आहेत. हा लोकप्रिय शो सुरू होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. या रिऍलिटी शोमध्ये कोणते स्पर्धक भाग घेणार हे देखील समोर आले आहे. यंदाच्या या पर्वात एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेताही या शोमध्ये खळबळ माजवण्यासाठी येणार असल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्याने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरचं तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहिला आहे. हा अभिनेता म्हणजे विवियन डिसेना.
खरंतर हा अभिनेता दुसरा कोणी नसून विवियन डिसेना आहे. विवियन हा छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेता आहे. त्याने २००८ मध्ये ‘कसम से’ या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ‘प्यार की ये एक कहानी’ या शोमध्ये व्हँपायरची भूमिका साकारल्यानंतर या अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ‘मधुबाला-एक इश्क एक जुनून’, ‘शक्ती – अस्तित्व के एहसास’ यांसारख्या मालिकांमधून त्याने टेलिव्हिजन विश्वावर राज्य केले. विवियन त्याच्या व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी झाला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले पाहायला मिळाले.
विवियनने २०१३ मध्ये अभिनेत्री वहबिज दोराबजीशी लग्न केले, पण लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. २०१६ मध्ये, विसंगतीमुळे ते वेगळे झाले आणि २०२१ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. विवियनने २०२२ मध्ये नूरन एली नावाच्या इजिप्शियन मुलीशी दुसरे लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी देखील आहे. विवियनने दुसऱ्या लग्नाआधी धर्म बदलला होता आणि इस्लामचा स्वीकार केला होता. खुद्द अभिनेत्याने या बातमीला दुजोराही दिला होता.
आणखी वाचा – Video : सैफ-करीनाच्या लेकाची पापाराझींवर दादागिरी, जोरात अंगावर ओरडला अन्…; नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन
विवियन डिसेनाचा जन्म उज्जैन येथे हिंदू आई आणि ख्रिश्चन वडिलांच्या पोटी झाला. त्याने २०१९ मध्ये ख्रिश्चन धर्मातून इस्लाम धर्मात बदल केला. एका जुन्या मुलाखतीत स्वत: विवियनने याची पुष्टी केली आणि म्हणाला, “माझ्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही. मी ख्रिश्चन जन्माला आलो आणि आता मी इस्लामचे पालन करतोय. मी २०१९ मध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात हे चांगले कार्य केले. इस्लामचे पालन करणे मला खूप चांगले वाटते. दिवसातून पाच वेळा प्रार्थना करण्यात शांतता आहे”.