शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘बिग बॉस’साठी विचारणा झाली तर होकार देणार का?” ऐश्वर्या नारकरांना प्रश्न विचारताच दिलं उत्तर, म्हणाल्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 5, 2024 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar On Bigg Boss Marathi

Aishwarya Narkar On Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वाचा अंतिम सोहळा दिमाखात पार पडताना पाहायला मिळणार आहे. या सीझनच्या विजेतेपदावर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात कलाकार मंडळींसह गायक, रॅपर, रील स्टार यांना देखील खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. या विविध कलाक्षेत्रातील कलाकारांनी हे पर्व विशेष गाजवलं. घरातील वाद-विवाद, प्रेम, मैत्री यांनी एक उंची गाठलेली पाहायला मिळाली. स्पर्धकांचे टास्क आणि त्यांच्या खेळाचं कौतुक झालेलं पाहायला मिळालं.

यंदाच्या या पर्वातील स्पर्धकांच्या चुकांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या दिसल्या. अनेकांना ट्रोलही करण्यात आलं. तर काहींनी ज्येष्ठ स्पर्धकांचे केलेले अपमान पाहून सिनेविश्वातील कलाकारांनीही स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाली. यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या चुका लक्षात घेता अनेक कलाकारांनी यावर सडेतोडपणे मत मांडत भाष्य केलेलं दिसलं. आता या पाठोपाठ मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीनेही ‘बिग बॉस’बाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “हाच प्लेबॉय…”, निक्की अरबाजमधील जवळीक पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “प्रेमाचं नाटक करत…”

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर हटके रील व्हिडीओ शेअर करत त्या नेहमीच प्रेक्षकांच्या नजरेत येतात. अनेकदा त्यांना या रील व्हिडीओवरुन ट्रोलही करण्यात आलं आहे, मात्र वेळोवेळी त्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसल्या आहेत. ऐश्वर्या या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चे सगळे सदस्य पुन्हा एकत्र, आर्या नसल्यामुळे प्रेक्षकांनी विचारला जाब, म्हणाले, “नको ते चाळे दाखवता पण…”

ऐश्वर्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यात “बिग बॉस’ची ऑफर आली तर स्वीकारणार का?”, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना केला आहे. या प्रश्नाचं ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरत आहे. चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर ‘नाही’ असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar On Bigg Boss Marathibigg boss marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss 18 vivian dsena

आठ वर्षांनंतर घटस्फोट, दुसऱ्या लग्नापूर्वी इस्लाम धर्माचा स्वीकार अन्…; आता सुप्रसिद्ध अभिनेता Bigg Boss 18 मध्ये राडा घालणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.