शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या पाचव्या वर्षीच दिला मुलाला जन्म, दोन किलोपेक्षा अधिक होतं बाळाचं वजन अन्…; ‘ते’ रहस्य अजूनही उलगडलं नाही कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2024 | 12:26 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Lina medina girl became a mother at the age of just 5 years see the details

वयाच्या पाचव्या वर्षीच दिला मुलाला जन्म, दोन किलोपेक्षा अधिक होतं बाळाचं वजन अन्...; 'ते' रहस्य अजूनही उलगडलं नाही कारण...

आई होण्याचा अनुभव कोणत्याही स्त्रीसाठी खूप अनोखाच असतो. पण जेव्हा एखादी स्त्री अविवाहित असताना आई किंवा गर्भवती असते, तेव्हा तिच्यासाठी ही एक खूप मोठी समस्या बनते. त्यातच गर्भवती महिला अवघ्या ५ वर्षांची असेल, तर गर्भधारणा अधिकच चिंताजनक असू शकते. कारण अशा वयात कोणत्याच मुलींचं शरीर गर्भधारणेसारख्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतं.

याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलीची गोष्ट सांगणार आहोत, जी जगातील सर्वात लहान आई आहे. पेरूच्या राजधानी लिमा शहरात राहणाऱ्या लीना मदिना नावाच्या या मुलीने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षात एका निरोगी मुलाला जन्म दिला. ही घटना आजही वैद्यकीय जगतासाठी एक गूढच राहिले आहे, कारण इतक्या लहान वयात ती आई कशी झाली? याचा उलगडा आजतागायत झालेला नाही.

लीना मदिनाचा जन्म २७ सप्टेंबर १९३३ रोजी पेरूमधील टिक्रापो येथे झाला. लीना पाच वर्षांची असताना तिच्या पोटाचा आकार अचानक वाढू लागला. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना ट्यूमरमुळे तिचे पोट वाढत असल्याचे वाटले. टिक्रापो हा ग्रामीण व मागासलेला भाग असल्याने तेथे रुग्णालयाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे एका मांत्रिकाकडून तिच्यावर भूतबाधाद्वारे उपचार करण्यात आले. यामुळे लीनाच्या पोटातील मूल वाढतच गेले. मात्र, कालांतराने यातून काहीच होत नाही. हे लक्षात येताच लीनाला शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉ. जोरार्डो लोझाडा यांनी लीनाची तपासणी करताच तिच्या गर्भधारणेचा संशय आला.

आणखी वाचा – यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक

डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर लीना गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. लीनाच्या कमी वयामुळे तिच्या व तिच्या बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळेच जवळपास महिनाभर तिला डॉक्टरांच्या देखरेखेखाली रुग्णालयात ठेवण्यात आले. मग अखेर १४ मे १९३९ रोजी लीनाने मुलाला जन्म दिला. तोपर्यंत पेरूसह संपूर्ण जगाच्या मीडियामध्ये लीनाची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लीनाला वयाच्या तीन वर्षापासून मासिक पाळी येऊ लागली होती. त्यामुळे वयाच्या ५ वर्षापर्यंत गर्भ मुलाला जन्म देण्यास सक्षम होता. बाळाच्या जन्माच्यावेळी डॉक्टरांनी लीनावर ऑपरेशन केले. तेव्हा डॉक्टरांना तिचे प्रजनन अवयव पूर्णपणे विकसित झाल्याचेही आढळले. जन्माच्या वेळी मुलाचे वजन हे २.७ किलो होते आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरून त्याचे नाव ‘जोरार्डो’ ठेवण्यात आले. 

आणखी वाचा – Oscar 2024 : ऑस्करमध्ये ‘ओपेनहायमर’ने मारली बाजी, कोण ठरलं सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक, वाचा संपूर्ण यादी

लीनाच्या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न हा होता की, ती नेमकी आई कशी झाली? आणि याचे उत्तर खुद्द लीनालाही माहीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी लीनाचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय प्रथम लीनाच्या वडिलांना आला, मात्र वैद्यकीय तपासणीत हेही चुकीचे निष्पन्न झाले. दरम्यान, लीना राहत असलेल्या गावाच्या आजूबाजूच्या अनेक गावात वर्षातून एकदा पारंपारिक उत्सव साजरा केला जात असे. या उत्सवादरम्यान मुला-मुलींमध्ये सामूहिक शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या काळात अनेक मुलींवर बलात्कारही झाले. त्यामुळे लीनावरही बलात्कार झाला असावा, असे मानले जात होते. मात्र, लीनाच्या वयामुळे ही बाबही संशयास्पद होती. त्यामुळे लीनाच्या आई होण्याचे गूढ कायमच राहिले.

Tags: गूढ असलेली बातमीगूढ बातमीगूढात्मक बातमीलहान वयात आईलीना मेदिनाentertainment newsLina MedinaMother at Young AgeMysterious Marathi NewsMysterious News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Twinkle Khanna Statement

"माझ्या दोन्ही मुलांनी पळून जाऊन लग्न करावं कारण…", भलतंच बोलून गेली अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना, म्हणाली, "माझा नवरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.