शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“उगाच मालिका वाढवत आहेत”, ‘सातव्या मुलीची…’मधील विरोचक व देवीआईच्या कथेमधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “फक्त मुर्खपणा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 29, 2024 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo audience expressed their displeasure see the details

"उगाच मालिका वाढवत आहेत", 'सातव्या मुलीची...'मधील विरोचक व देवीआईच्या कथेमधील ट्वीस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "फक्त मुर्खपणा..."

छोट्या पडद्यावरील मालिका या  अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. मालिकेतील पात्र, त्याची कथा आवडत असल्यास त्यावर आपलं मत व्यक्त करतात. मात्र काही नवीन ट्विस्ट किंवा नवीन वळण प्रेक्षकांना आवडले नाही तर त्याबद्दल नाराजीही व्यक्त करतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला, जो काही प्रेक्षकांना आवडला, तर काहींना तो आवडला नाही. या प्रोमोमध्ये रुपालील संमोहित करण्याची जी शक्ती मिळाली आहे, त्या शक्तीचा ती राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. या शक्तीविरुद्ध कसे लढता येईल याचा नेत्रा-अद्वैत विचार करत आहेत. हेच या प्रोमोमध्ये पाहायला मिळत असून प्रोमोवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – विरोचकाने शरीराचा ताबा घेतल्यानंतर केतकी व फाल्गुनी एकमेकींचाच जीव घेणार, नेत्राला देवीआईचा संकेत अजूनही नाही, बळी जाणार का?

या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कुठे तरी आता असं वाटू लागलं आहे की लेखक आता बालिश बुद्धिने कथा लिहित आहेत. घरातली सर्वच मंडळी लहान मुलांसारखे आता घरामध्ये राक्षसाचा खेळ खेळत आहेत असं वाटत आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कृपया मालिका वाढवायची आहे, म्हणून काही पण दाखवू नका. असं दाखवून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. गेले कित्येक भाग विरोचक श्रेष्ठ दाखवला आहे, मुळात जिथे देवाचा वास असतो, तिथे दुष्ट शक्ती नसते. एवढं साधं माहीत नाही का?, देवाचे वरदान असलेल्या मुलींना मूर्ख दाखवले आहे. असं केलं पाहिजे, वाट बघितली पाहिजे, विचार केला पाहिजे सतत हेच डायलॉग दाखवले आहेत”.

आणखी वाचा – ‘सैराट’मधील परश्याचे मित्र आता जगत आहेत असं आयुष्य, सध्या नेमकं काय काम करतात?, लूकही बदलला अन्…

तर आणखी एकाने “हा मूर्खपणा दाखवल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरला पाहिजे, ते समाजाला चुकीचा संदेश देत आहेत. प्रत्येक भाग हा निव्वळ बकवास आहे, जर त्यांच्याकडे काही कंटेट नसेल तर त्यांनी फक्त शो संपवावा आणि लेखकांनी सक्रियपणे राजीनामा द्यावा. काही नैतिक जबाबदारी घेऊन हा मूर्खपणा संपवावा” असं म्हटलं पाहिजे. तर आणखी एकाने “मूर्खांनो, जे देवाचे अवतार घेतात, ते इतके कामजोर कसे दाखवतात. उगाच काही पण नका दाखवू.” असं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना ही मालिका आवडत असून त्यांनी या प्रोमोला लाईक्स व कमेंट्सद्वारे संमती दर्शवली आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
akshya deodhar and hardeek joshi instagram

बायकोसह सप्तश्रृंगी गडावर पोहोचला राणादा, कुटुंबियांसह भर उन्हात दर्शन, पाठकबाईंच्या युनिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.