सोमवार, मार्च 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकाने शरीराचा ताबा घेतल्यानंतर केतकी व फाल्गुनी एकमेकींचाच जीव घेणार, नेत्राला देवीआईचा संकेत अजूनही नाही, बळी जाणार का?

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 29, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
satvya mulichi satvi mulgi marathi serial update new twist

विरोचकाने शरीराचा ताबा घेतल्यानंतर केतकी व फाल्गुनी एकमेकींचाच जीव घेणार, नेत्राला देवीआईचा संकेत अजूनही नाही, बळी जाणार का?

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस खूपच उत्कंठावर्धक बनत चालली आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट्स या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा अधिकच वाढवत आहेत. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विटस प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता असते. अशातच मालिकेत नुकताच विरोचक हा राजाध्यक्षांच्या घरात आल्यामुळे नवीन संकट आले आहे.

विरोचकाने रुपालीला एक अदृश्य शक्ती दिल्यामुळे रुपाली त्या शक्तीचा कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीचा वापर केतकी व फाल्गुनी यांना वश करते. तसेच रुपालीने त्या दोघींनी कुणी त्रास दिला तर त्या स्वत:च एकमेकींचा जीव घेतील. त्यामुळे तिच्या या शक्तीविरुद्ध कसे लढायचं? असा प्रश्न नेत्रा-अद्वैत यांना पडला आहे. अशातच या मालिकेत आगामी भागात काय होणार? याचा एक प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : लग्नानंतर नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात धमाल, आता भारतात परतली पूजा सावंत, व्हिडीओ चर्चेत

यामध्ये नेत्रा-अद्वैत विरोचकाच्या शक्तीविरुद्ध कसं लढायचं याचा विचार करत आहेत. यामध्ये अद्वैत नेत्राला असं म्हणत आहे की, “आपल्याकडे विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध लढण्याचा काही उपाय नाही का?” यावर नेत्रा असं म्हणते की, “कदाचित याचं उत्तर चौथ्या पेटीत असेल किंवा विरोचकाला पाचवी पेटी मिळाली आहे का?” असं म्हणते. त्यामुळे अद्वैत “आता विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध लढणं फारच अवघड झालं आहे’ असं म्हणतो. पण यावर नेत्रा पुन्हा त्याला धीर देत “कठीण आहे पण अशक्य नाही” असं म्हणते.

आणखी वाचा – निवेदिता सराफांची त्यांच्या पाळीव श्वानासाठी बर्थडे पार्टी, घरात सजावटही केली अन्…; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

त्यामुळे आता विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा-अद्वैत कसे लढणार?, तसेच विरोचक त्याच्या शक्तीचा आणखी कुणाविरुद्ध वापर करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. विरोचकाने फाल्गुनी व केतकीला आपल्या संमोहित केले आहे. मग आता पुढे ती कुणाला संमोहित करणार का? याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newssatvya mulichi satvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Facts
Entertainment

आई-वडीलांचं निधन आणि शेतमजुरी; रील स्टार सुरज चव्हाणला ‘असं’ मिळालं FAME, UNKNOWN FACTS

मार्च 29, 2026 | 11:00 am
Anurag Dobhal news
Entertainment

‘बिग बॉस’ फेम अभिनेता झाला बाबा, काही दिवसांपूर्वीच अपघातातून वाचला, फोटोद्वारे दाखविली पहिली झलक

मार्च 28, 2026 | 5:25 pm
Varun Dhawan Daughter
Entertainment

वरुण धवनच्या दीड वर्षीय मुलीला झालेला गंभीर आजार, लेकीबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला, “वाकडं चालायची…”

मार्च 28, 2026 | 2:35 pm
Zee Marathi Serial Update
Entertainment

आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर केली अन्…

मार्च 28, 2026 | 2:00 pm
Next Post
arti singh on depression

आई-वडिलांना गमावलं, १३व्या वर्षी लैंगिक शोषण अन्…; आरती सिंह जगत होती असं आयुष्य, लग्नाचा निर्णय घेतला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.