झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
गेले काही दिवस राजाध्यक्षांच्या घरात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नेत्राच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचा अंश असल्याचे कळताच राजाध्यक्षांच्या कुटुंबात गंभीर वातावरण तयार झालं आहे. गेले अनेक दिवस विरोचक राजाध्यक्षांविरुद्ध अनेक नवीन चाली खेळत आहेत. मात्र विरोचकाच्या प्रत्येक कटकारस्थानाला राजाध्याक्ष एकजुटीने लढा देत आहेत. विरोचकाच्या शक्तीविरुद्ध त्यांनी एकत्र लढा दिल्यानंतर त्यांना आता नवीन धक्का मिळाला आहे.
अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे, ज्यामध्ये नेत्रा व इंद्राणी एकत्र एका श्लोकाचे वाचन करतात. ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की, “गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून आसुरी शक्तींकडे ओढ घेईल. यापुढे शेखर राजाध्यक्ष विरोचकाचा अंश नेत्राच्या पोटात वाढत असल्याचे अद्वैतला सांगतो. हे ऐकून अद्वैतलादेखील मोठा धक्का बसतो. यापुढे इंद्राणीही नेत्राला तिच्या पोटी विरोचकाचे बाल जन्माला येणार असल्याचे सांगते. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवीआई नेत्राला यातून काय नवीन मार्ग दाखवणार? आणि विरोचकाचा वध नक्की कुणाच्या हातून होणार? राजाध्यक्ष कुटुंबीय या धक्क्यातून सावरणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.