दिग्गज बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि अखेर ती बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. मुंबईत सोनाक्षीच्या घरी स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार दोघांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. लग्नाची नोंदणी करताना सोनाक्षी व झहीरचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र तिच्या लग्णावर तिचे वडील व घरातील इतर कुटुंबीय नाराज असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अशातच अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले आहे.
एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षीने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना झहीर इक्बालशी लग्न करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल सांगितले. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने म्हटलं की, “जेव्हा मी माझ्या वडिलांना झहीर व माझ्याबद्दल सांगितले. तेव्हा मी खूप घाबरले होते. ते कशी प्रतिक्रिया देतील? हे मला माहित नव्हते. तेव्हा मी त्यांना “तुम्हाला माझ्या लग्नाची काळजी वाटत नाही का? कारण तू मला याबद्दल कधीच काही विचारले नाहीस?”
यावर त्यांनी असं म्हटलं की, “मी तुझ्या आईला तुला विचारायला सांगितले आहे. मग मी त्यांना सांगितले की, माझ्या आयुष्यात झहीर नावाचा मुलगा आहे. यावर ती म्हणाली की, “हो, मी पण वाचले होते. मुले मोठी झाली आहेत. त्यामुळे माझी बायको राजी झाली तर मी काय करणार?” असं ते म्हणाले. यापुढे अभिनेत्री असं म्हणाली की, “माझे वडील किती शांत आहेत ते यावेळी मला जाणवले आणि त्यांनी आमच्या नात्याला पाठींबा दिला”.
याच मुलाखतीत तिचा पती झहीरही सोनाक्षीबरोबर सहभागी झाला होता. यावेळी तो असं म्हणाला की, “मी सोनाक्षीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी घाबरलो होतो, कारण तोपर्यंत मी त्यांच्याशी (शत्रुघ्न सिन्हा) कधीही समोरासमोर बोललो नव्हतो. बोलायला लागताच आम्ही लाखो गोष्टींवर चर्चा करू लागलो आणि आम्ही चांगले मित्र बनलो. मला माहित आहे की, त्यांची प्रतिमा घाबरवणारी आहे. पण ते खूप शांत व सर्वात गोड व्यक्ती आहेत”.
दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.