छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. मालिकेत गेले काही दिवस अनेक नवनवीन ट्विस्ट येत आहेत. एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नुकताच विरोचकाने राजाध्यक्ष कुटुंबियांना सर्वांना वश केले असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. मात्र आता वशमधून आता सगळेच बाहेर आले आहेत.
मालिकेतील हा ट्विस्ट संपताच आता नेत्राच्या गरोदरपणाचा नवीन ट्विस्ट आला आहे. मालिकेच्या या नवीन ट्विस्टचा प्रोमो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्रा आई होणार असल्याची खुशखबर देण्यात आली आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्राला डॉक्टर ती आई होणार असल्याची खुशखबर देतात. कथानकात आलेल्या या नवीन ट्विस्टला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे आणि याबद्दल प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

या प्रोमोवर चाहत्यांनी मालिकेबद्दल व मालिकेच्या कथानकाबद्दल समिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रोमोखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “अरे काय चाललं आहे? आतापर्यंत संपवली पाहीजे होती मालिका गावकार्यांसमोर देवीने अवतार घेऊन विचरोका वध केला पाहीजे होता”. तर आणखी एकाने “विरोचकच्या वधाने मालिका वेळेत संपवली असती तर बर झालं असत” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “बंद करा आता ही फालतुगिरी, काही सापडत नसेल तर जुना चित्रपट लावा रात्री साडेदहा वाजता, पण लोकांना उगाच वेड बनवायचं सोडा” अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

अशाच प्रकारे या प्रोमोवर मालिकेच्या काही चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. “खूपच छान वळण आहे आहे मालिकेत”, “यामुळे मालिकेला नक्कीच चांगले वळण आले आहे”, “या नवीन कथानकासाठी खूपच उत्सुक आहोत” अशा अनेक कमेंट्स करत या नवीन कथानकाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मालिकेत आता एकीकडे नेत्रा आई होणार असल्याची खुशखबर देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे नेत्राने केलेल्या श्लोकांची उकल ही नव्या संकटाची चाहूल असल्याचे वाटत आहे. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागांत नेत्रासह राजाध्यक्ष कुटुंबियांवर काय नवीन संकट येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.