ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर अनेक दशकांपासून मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रिल्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोलदेखील करतात.
ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत. मालिकेबरोबरच त्या सोशल मीडियाद्वारेही चांगलेच चर्चेत राहत असतात. अशातच त्यांनी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना मालिकेव्यतिरक्त खाजगी प्रश्नही विचारले आणि आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ऐश्वर्या यांनीही अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

आणखी वाचा –
यावेळी एका चाहत्याने ऐश्वर्या यांना त्यांच्या व अविनाश नारकरांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे. ऐश्वर्या यांना एका चाहत्याने लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे. चाहत्याने “लग्नानंतर तुम्हाला कुणी प्रपोज केलं आहे का? ज्यांना तुमचे लग्न झाले आहे हे माहीत नाही?”. असा प्रश्न विचारलं. यावर ऐश्वर्या यांनी हसत “सगळ्यांना माझं लग्न झालं हे माहिती आहे” असं उत्तर दिलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच आपल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची मराठी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या विरोचकाची भूमिका साकारत आहेत.