मालिका म्हटलं की त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग हा आलाच. कलाकारांचं मालिकेतील ऑनस्क्रीन बॉंडिंगप्रमाणे त्यांची पडद्यामागचे धमाल मस्ती पाहणं ही चाहत्यांना विशेष भावत. पडद्यामागे कलाकार मंडळीच बॉण्डिंग नेमकं कास असत याकडे प्रेक्षकांच्या अधिक नजरा असतात. चाहते हे या कलाकार मंडळींच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवूनच असतात. अशातच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील सीन शूट करण्याआधीच्या तयारी दरम्यानचा एक bts व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आणि प्रेक्षकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे.(Satvya Mulich Satvi Mulgi Bts)
सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या लोकप्रियता मिळतेय. मालिकेतील कलाकारांच्या भूमिका या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. अशातच या मालिकेतील सीन शूट करण्याआधीच एक एक bts व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल मेहेंदळे हे डायलॉग बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत, तर एकीकडे मालिकेतील मुख्य कलाकार तितिक्षा तावडे ही इतर सहकलाकारांसोबत मस्ती करतेय, अशा हा व्हिडीओ आहे. मालिकेतील असेच सीन शूट करतानाचे bts व्हिडीओ प्रेक्षकांना अधिक आवडतात.(Satvya Mulich Satvi Mulgi Bts)
हे देखील वाचा – प्रसादला बरं वाटावं म्हणून अमृताने दिली प्रेमाची गोळी
सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या एकामागोमाग वळण आलेली पाहायला मिळत आहेत. मालिकेत पाहायला गेलं तर मालिकेतील खलनायीकांची भूमिका अधिक लक्षणीय आहे. खलनायकांच्या भूमिकेमुळे या मालिकेला टर्निंग पॉईंट मिळाला आहे.