मराठी बिग बॉस मुळे चर्चेत आलेली जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख. बिग बॉस मुळे त्यांची ही मैत्री अधिक घट्ट झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांच्यातील ही मैत्री अधिक वाढत गेली. बरेचदा अमृता आणि प्रसाद यांच्यात मैत्री पलीकडचं नातं आहे अशी भाष्य केलं जायचं, मात्र त्यांच्यात मैत्री व्यक्तिरिक्त काही नाही असं त्यांनी बरेचदा सांगितलंय.(Prasad Jawade Amruta Deshmukh)
प्रसाद आणि अमृता नेहमीच त्यांच्या दोघांचे फोटोस सोशल मीडियावरून पोस्ट करत असतात. चाहतेही त्यांच्या या फोटोसवर भरभरून प्रतिसाद देतात. अशातच अमृताने प्रसाद सोबतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या फोटोसोबत त्याखालील कॅप्शन आणि प्रसादाची आलेली कमेंट अधिक लक्षवेधी आहे. Here’s a प्यारा-सिटेमॉल for you @prasadjawade ????.. hope you feel better असं कॅप्शन अमृताने दिल आहे.
पाहा प्रसाद अमृताचं अनोखं बॉण्डिंग (Prasad Jawade Amruta Deshmukh)
यावरून प्रसादाची तब्येत ठीक नसल्याचं कळतंय. त्यावर मात्र प्रसादने दिलेलं उत्तर अधिक लक्षवेधी आहे, प्रसादने अमृताच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय, WHO said medicine can cure .???????? Feeling better than ever , प्यारी ! असं म्हटलंय. त्यांच्यातील हे गोड संभाषण पाहता त्यांच्यात खरंच मैत्री पलीकडील नातं आहे का असा प्रश्नच पडलाय.(Prasad Jawade Amruta Deshmukh)
हे देखील वाचा – वाढदिवसाचं औचित्य साधत राधा सागरने दिली गुडन्यूज
प्रसादने आणि अमृताने आजवर छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचं बरच मनोरंजन केले आहे. प्रसाद आणि अमृता हे सध्या मराठी इंडस्ट्रीतील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहे. प्रसाद आणि अमृता अधूनमधून एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. बॅकस्ट्रीट बॉईजच्या कॉन्सर्टलाही त्यांनी हजेरी लावली होती. या कॉन्सर्टदरम्यानचे काही फोटोदेखील त्यांनी शेअर केले होते. ते फोटो पाहून दोघांनी एकत्र खूप चांगला वेळ घालवल्याचं दिसलं.