‘ससुरल सिमर का’ या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर ही प्रकाशझोतात आली. या मालिकेच्या माध्यमातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील सहकलाकार शोएब इब्राहिमबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांना एक मुलगादेखील आहे. सध्या दीपिका अभिनय क्षेत्रापासून लांब असलेली पाहायला मिळत आहे. पण तिचे स्वतःचे युट्यूब चॅनल असून त्यावर ती व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वी तिने सासूबाईंच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली होती. यामध्ये सासूबाईंना अशा अवस्थेत बघवत नसल्याचेदेखील ती म्हणाली होती. आता पुन्हा एकदा ती सासू बाईंच्या बाबतीत भावनिक होताना दिसत आहे. (dipika kakar on mother in law)
सोशल मीडियावर दीपिका व शोएब हे नेहमी सक्रिय असतात. या दोघांमधील चांगला बॉंडदेखील पाहायला मिळतो. नुकताच दीपिकाने मातृदिन साजरा केला. त्याबद्दल तिने व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना सर्व माहिती दिली आहे. दीपिका या दिवशी आपली आई, सासू व घरातील इतर महिलांना घेऊन स्कीनकेअर क्लिनिकमध्ये गेली होती. त्यानंतर त्यांनी शॉपिंग केली आणि सर्वजणी घरी परतल्यानंतर खूप खुश दिसल्या.
घरी सर्वजणींसाठी शोएबने आमरास पुरी बनवली होती. अनेकांनी दीपिकाच्या सासूवर टिका केली आहे. पण तिची सासू खूपच प्रेमळ असल्याचे तिने सांगितले आहे. त्यांच्या बाजूने ती नेहमी बोलताना दिसते.
सासूची बाजू घेताना दीपिका भावनिक होतानाही दिसते. ती सासूची बाजू घेत म्हणाली कि कोणाच्याही आईची अशी टिका करणे योग्य नाही. हे असं करणं खूप चुकीचं आहे. शोएब व दीपिका मागील वर्षी आई-वडील झाले. २०१८ साली दोघांनी लग्न केले त्यानंतर पाच वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रुहान ठेवले. आई वडील झाल्यानंतर दीपिका व शोएब यांचे नातं खूप घट्ट झाले. दोघंही त्यांच्या मुलाबद्दल सोशल मीडियावर माहिती देत असतात.