सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कंगना रणौत, हेमा मालिनी यांची संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त, काय खरं आणि काय खोटं?, एकूण संपत्ती तब्बल…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 15, 2024 | 2:35 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
pm narendra modi property

कंगना रणौत, हेमा मालिनी यांची संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त, काय खरं आणि काय खोटं?, एकूण संपत्ती तब्बल…

  सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुका २०२४ चे मतदान देशभरात सुरु झाले आहे. हे मतदान पाच टप्प्यात होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारदेखील निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत. वेगवेगळ्या विभागातून त्यांना उमेदवारी मिळाली असून यामध्ये कंगना रनौत, हेमा मालिनी, पवन सिंह यांचा समावेश आहे. निवडणुकांच्या आधी उमेदवारी फॉर्म भरताना स्वतःच्या मालमत्तेचा अहवाल सादर केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. यामध्ये इतर कलाकारांची संपत्ती ही नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. (pm narendra modi property)

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या कंगनाला भाजपातर्फे हिमाचल येथील मंडी येथून तिकीट मिळाले आहे. नुकतेच तिने आपले निवडणुकांसाठी नामांकन दाखल केले असून तिच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. कंगनाची ९१.५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच कंगनाकडे मुंबईमध्ये सात व मंडीमध्ये एक म्हणजेच आठ बँक अकाऊंट आहेत. यामध्ये २ कोटी ५५ लाख ८६ हजार ४६८ रुपये आहेत. तसेच आईडीबीआय बँकेमध्ये दोन अकाऊंट असून एका अकाऊंटमध्ये एक कोटी सात लाख आणि दुसऱ्या अकाऊंटमध्ये २२ लाख रुपये जमा आहेत. तसेच बँक ऑफ बडोदा बँकेतील खात्यात १५,१८९,४९ रुपये जमा आहेत. मुंबईतील एचएसबीसी बँकेमद्धे तिचे १,०८,८४४,०१ रुपये व स्टँडर्ड चार्टर्ड अकाऊंटमध्ये १,५५,५०४ रुपये जमा आहेत. कंगनावर एकूण १७.३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

आणखी वाचा – अधिपतीच्या जवळ जाण्याचा सरगम मॅडमचा प्रयत्न, अक्षराला नवऱ्याला गमावण्याची भीती, भूवनेश्वरी दोघांना एकमेकांपासून दूर करु शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

अभिनेत्री हेमा मालिनी यांनादेखील मथुरा येथून उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये हेमा यांच्याकडे ३ कोटी ३९ लाख ३९ हजार ३०७ रुपयांचे दागिने आहेत. तसकह पती यांच्याकडेदेखील १ कोटी ७५ लाख ८ हजार २०० रुपयांचे दागिने आहेत. हेमा यांची १२ कोटी ९८ लाख २ हजार ९५१ रुपयांची संपत्ती आहे. तसेच १८ लाख ५२ हजार ८६५ रुपयांची रोख रक्कम आहे. हेमा यांच्याकडे १ अब्ज १३ कोटी ६० लाख ५१ हजार ६१० रुपयांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत.

आणखी वाचा – “वाईट बोलत आहेत आणि…”, साखरपुड्यानंतर ट्रोल करण्यावरुन अब्दू रोजिकचा संताप, म्हणाला, “तिचे कुटुंबियही वाचत असतील तर…”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

तसेच भोजपुरी मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार पवन सिंह हे काराकाट येथून  लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांनी देखील आपल्या संपत्तीचा अहवाल दिला आहे. यामध्ये त्यांची ५ कोटी ४ लाख ९३ हजार ८१९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच १० कोटी ३१ लाख ३८ हजार ८४० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच ६० हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांची एकूण मालमत्ता २ कोटी ६० लाख १० हजार २३७ रुपये आहे. त्याचप्रमाणे ३१ लाख ४ हजार रुपयांचे दागिने आहेत. त्यांचे लखनऊ व मुंबईमध्ये ६.५ कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. पवन यांची एकूण ५ कोटी  ४ लाख ९३ हजार ८१९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच १० कोटी ३१ लाख ३८ हजार ८४० रुपये जंगम मालमत्ता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील वाराणसी यथून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांनीदेखील आपल्या मालमत्तेची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे ५२ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. त्यांचे गुजरात येथे दोन अकाऊंट असून एका अकाऊंटमध्ये ७३ हजार ३०४ रुपये जमा आहेत. तर वाराणसी येथील खात्यात केवळ सात हजार रुपये आहेत. मोदी यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ कोटी ८५ लाख ६० हजार ३३८ रुपयांची एफडी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ९ लाख १२ हजार रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांची एकूण ३ कोटी २ लाख ६ हजार ८८९ रुपयांची संपत्ती आहे.  

Tags: hema malinikangna ranautnarendra modiproperty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.