शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देत आहे गंभीर आजाराला मात, व्हिडीओद्वारे दाखवली अवस्था, आता कशी आहे प्रकृती?

Saurabh Moreby Saurabh More
मे 15, 2024 | 5:23 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Krutika Gaikwad talked about her fibroid disease through a video.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देत आहे गंभीर आजाराला मात, व्हिडीओद्वारे दाखवली अवस्था, आता कशी आहे प्रकृती?

मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी ही आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपले सुख:दुख चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. एखादी आनंदाची बातमी असो किंवा एखादा दु:खद प्रसंग असो, सोशल मीडियाद्वरे ही मंडळी कायमच व्यक्त होताना दिसतात. त्याचबरोबर त्यांना असणाऱ्या एखाद्या आजाराबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात., अशातच एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आहे कृतिका गायकवाड हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे तिने तिला झालेल्या एका गंभीर आजाराविषयीची माहितीही दिली आहे. या आजारामुळे कृतिकाचं पोट फुगलेलं दिसत आहे. मात्र आपण गरोदर नसून आपल्याला एक आजार झाला आहे असं सांगणारी एक पोस्ट तिने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता आणि आता कृतिकाने तिचे पोट फुगलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Krutika Gaikwad (@krutikaim)

हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “नाही मी गरोदर नाही, हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत जे वर्षानुवर्षे विकसित झाले आहे. फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. ही गाठ म्हणजे कर्करोग नाही. फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये ही लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ डोळ्यांनी पाहण्यास खूपच लहान आहेत”.

आणखी वाचा – आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “एक फायब्रॉइड जो खूप मोठा होतो तो गर्भाशयाच्या आतील आणि बाहेरील भाग खराब करू शकतो. या गाठींमुळे तुम्ही आई होण्याच्या आनंदाला मुकू शकता. अनेक प्रकरणांमध्ये, काही फायब्रॉइड्स श्रोणि किंवा पोटाचे क्षेत्र भरण्याइतके मोठे होतात. कृतिकाला हा आजार झाल्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा भास होतो”.  

आणखी वाचा – नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

कृतिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांसह मित्रपरिवाराने तिला या आजारातून बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. कृतिका एक अभिनेत्री असण्याबरोबर रक नृत्यांगनादेखील आहे. कृतिकाने आजपर्यंत काही डान्स रिऍलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवली. तसेच ‘गैरी’, ‘टाईमपास ३’ चित्रपटात तिने आयटम सॉन्ग केलं आहे.  

Tags: Krutika Gaikwad Fibroid Marathi NewsKrutika Gaikwad Fibroid Newsmarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
 Kajol breaks silence on breaking no kissing policy
Entertainment

“मला अस्वस्थ वाटतं”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने ३० वर्षांनी मोडली NO KISSING SCENE पॉलिसी, म्हणाली…

एप्रिल 24, 2026 | 10:13 am
Next Post
shoaib akhtar on sonali bendre

धक्कादायक! पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तरने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी, म्हणाला, “माझ्याशी लग्नाला नकार दिला तर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.