झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ ए गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. आपल्या आवाजाने कायमच चर्चेत राहणारी कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे गायिका नुकतीच आई झाली आहे.
काल (१४ मे) रोजी कार्तिकीने सोशल मीडियाद्वारे आई झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. कार्तिकीला मुलगा झाला असून सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत तिने तिच्या लाडक्या चिमुकल्या राजकुमाराचे स्वागत केले आहे. “आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. हा एक नवीन सापडलेला खजिना आहे. आम्हाला आमचे नवीन प्रेम सापडले आहे. हा क्षण खरंच शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही. कारण मूल असण्याची ही भावना छान असते” असं आनंद कार्तिकीने पोस्टमधून व्यक्त केला आहे.
कार्तिकीने तिच्या आई झाल्याची बातमी शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच तिला अनेक स्तरातून शुभेच्छाही येत आहेत. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टखाली तिला तिच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गायिकेचे कौतुकही केले आहे. गायिका शमिका भिडे व शरयू दाते यांच्यासह शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, प्रियंका केतकर, शंतनू मोघे यांसारख्या अनेक कलाकारांनीही तिला कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे.

दरम्यान, ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.