मनोरंजन विश्व हे जितकं ग्लॅमरस आहे, तितकीच या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची शोकांतिका आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य वेदनादायी असतं. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींचे खरे आयुष्य खूप वेदनादायी राहिले आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी हुपच संघर्ष करत त्यांचा इथवरचा प्रवास केला आहे. या अभिनेत्रीला तिच्याअ कुटुंबातील काही आर्थिक अडचणींमुळे वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या अभिनेत्रीला शाळेतही जाता आले नाही. या प्रसिद्ध अभिनेत्रीने या चंदेरी दुनियेत आपले नाव कमावले, पण या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य खूपच वेदनादायी आहे. ही अभिनेत्री म्हणजे सारिका ठाकूर.
‘एबीपी’च्या वृत्तानुसार, सारिकाचा जन्म नवी दिल्लीत झाला. ती लहान असताना तिच्या वडिलांनी कुटुंब सोडले, ज्यामुळे सारिकाला ५व्या वर्षापासून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली आणि यामुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही. सारिकाने वयाच्या ५व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. अनेक वर्षे बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर सारिकाने सचिन पिळगावकरांबरोबर ‘गीत गाता चाल’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. यानंतर सारिकाने ‘रझिया सुलतान’, ‘बडे दिल वाले’, ‘कैसे कैसे लोग’, ‘नास्तिक’, ‘मैं कातील हूं’, ‘उंचाई’सारखे अनेक चित्रपट केले.
यामुळे सारिका त्या काळातील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. तेव्हा सारिका कमावत असलेल्या पैशांतून तिच्या आईने नकळत पाच फ्लॅट खरेदी केले होते आणि एकही फ्लॅट सारिकाच्या नावावर नाही. आईच्या या विश्वासघातानंतर अभिनेत्रीने घर सोडले. यादरम्यान सारिका कमल हसन यांच्याबरोबर रिलेशनमध्ये आली आणि मग ते दोघे लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहू लागले. लग्नाआधीच सारिका श्रुती व अक्षरा या दोन मुलींची आई बनली. लग्नाआधीच सारिका श्रुती आणि अक्षरा या दोन मुलींची आई बनली आणि त्यानंतर १९८८ मध्ये तिने कमल हसनबरोबर लग्न केले.
मात्र सारिका व कमल हसन यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. कारण, कमलचे त्याची सह-अभिनेत्री गौतमबरोबर विवाहबाह्य संबंध होते. पतीच्या विश्वासघाताने खचलेल्या सारिकाने इमारतीवरून उडी मारली. यात तिला गंभीर दुखापत झाली होती आणि तिला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये घालवावे लागले. हॉस्पिटलमधून आल्यानंतर तिने कमल हसनबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर २००२ मध्ये सारिका व कमल हसन यांचा घटस्फोट झाला.
या घटस्फोटानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या दोन्ही मुलींनीही तिची साथ दिली नाही. लग्नानंतर त्या दोघींनीही वडिलांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पतीने फसवणूक केल्यावर तिच्या मुलींनीही साथ दिली नाही, म्हणून सारिका मुंबईत आली. यानंतर तिच्या आईने तिच्या नावावरील पाच फ्लॅट्सपैकी एक फ्लॅट नोकराच्या नावावर केला. सारिकाने तिची संपत्ती परत मिळवण्यासाठी न्यायालयात दादही मागितली. पण इथेही टिळायश मिळाले नाही, ती केस हरली आणि तिची संपत्ती तिच्या आईच्या नोकराकडे गेली. त्यामुळे अभिनेत्री सारिका ठाकूर आज मुंबईत हलाखीचे व एकाकी जीवन जगत आहेत.