सगळीकडे सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही बाप्पाच्या आगमनासाठी विशेष तयारी केली होती. कलाकारांनी व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत गणपतीसाठी मोदक बनवले. त्यादरम्यानचे बरेच व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता गायक प्रथमेश लघाटेही मोदक बनवताना दिसत आहे. त्याने स्वयंपाकघरात मोदक बनवतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (Prathamesh Laghate making Modak for Ganpati Bappa)
मोदक हा बाप्पाचा आवडता नैवैद्य. मोदकाशिवाय बाप्पाचं नैवैद्य कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे गणेशोत्सवात प्रत्येकाच्या घरी हमखास मोदक बनवले जातात. प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटेच्या घरी गणरायाचे आगमन झालं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याच्या घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रथमेश दरवर्षी गणपती बाप्पासाठी मोदक बनवत असून याहीवर्षी त्याने मोदक बनवले. त्याचा मोदक बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – ‘बॉईज ४’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, निखिल-गौरवची दिसली झलक, ओंकार भोजने न दिसल्याने नेटकरी नाराज
प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो स्वयंपाक घरात बसून उकडीचे मोदक बनवताना दिसतोय. प्रथमेशचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “तुझ्यासारखा छान, सुबक, गोड मोदक केला आहेस हो अगदी” अशी कमेंट करत प्रथमेशचं कौतुक केलं आहे.
हे देखील वाचा – दुकानावर गुजराती भाषेमध्ये नावाची पाटी पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “महाराष्ट्रात व्यवसायांच्या पाट्या…”

छोट्या पडद्यावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या प्रथमेशने आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश व मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांचे केळवण थाटामाटात पार पडले. दोघांनी सध्यातरी त्यांच्या लग्नाबद्दल काही माहिती दिली नसली, तरी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागलेली आहे.